Baap Manus Movie: निर्माते आनंद पंडित आणि पुष्कर जोग (Pushkar Jog) यांच्या निर्मिती संस्था अनुक्रमे आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी एकत्रित निर्मिती करत असलेल्या 'बाप माणूस' या चौथ्या चित्रपटाची घोषणा आज दसरा सणाचे औचित्य साधून सोशल मीडियावर केली. या चित्रपटाचे शूटिंग देखील लंडन मध्ये होणार आहे .
'बाप माणूस' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग, अनुषा दांडेकर, कुशल बद्रिके, शुभांगी गोखले आणि बाल कलाकार कीया इंगळे हे आहेत. योगेश फुलपगार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. बाप माणूस चे निर्माते आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग आहेत तर सह निर्माते - वैशाल शाह, राहुल व्ही दुबे हे आहेत .
या महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे. पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अनुषा बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात काम करणार आहे. पुष्करचा 'व्हिक्टोरिया' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. वैशल शाह हे सह निर्माता आहेत. गतवर्षी या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला आणि या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे पुष्करचा
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Nimisha Sajayan : 'द ग्रेट इंडियन किचन'ची नायिका मराठीत, 'हवाहवाई' सिनेमात निमिषा सजयन मुख्य भूमिकेत