बाहुबलीला मरण्यासाठी 25 कोटी रुपये तर कटप्पाला केवळ....!
एबीपी माझा वेब टीम | 03 May 2017 12:04 PM (IST)
मुंबई : बॉक्स ऑफिसवर यशाची आणि कमाईची शिखरं पादाक्रांत करणारा एस एस राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली - द कन्क्लुजन' संदर्भात एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सिनेमातील कलाकारांनी या चित्रपटासाठी किती फी आकारली याचा उल्लेख व्हिडीओमध्ये आहे. 30 एप्रिल रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. आतापर्यंत 45 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. दरम्यान, एबीपी माझा डॉट इनने ह्या व्हिडीओची पडताळणी केलेली नाही. पीळदार शरीरयष्टी, भारदस्त, पराक्रमी, हुशार तेवढाच प्रेमळ, मोठ्या पडद्यावर असा बाहुबली साकारणाऱ्या प्रभासने सिनेमासाठी तब्बल 25 कोटी रुपये घेतले आहेत. धिप्पाड देह, डोळ्यात द्वेष, कारस्थानी माहिष्मतीची महाराज बनण्याचं एकमेव ध्येय असलेला भल्लादेवही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. भल्लालदेवची भूमिका साकारणाऱ्या राणा डग्गुबतीने या चित्रपटासाठी 15 कोटी रुपये घेतल्याचं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तर सिनेमात अवंतिकाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या तमन्ना भाटियाने सिनेमाचा भाग बनण्यासाठी निर्मात्यांकडून 5 कोटी रुपये घेतले. 'बाहुबली - द कन्क्लुजन'मध्ये अमरेंद्र बाहुबलीएवढीच छाप पाडणारी देवसेना अर्थात अनुष्का शेट्टीनेही सिनेमासाठी 5 कोटी रुपये आकारले. सिनेमातील महत्त्वाची आणि सर्वाधिक चर्चेत असलेली व्यक्तिरेखा म्हणजे कटप्पा. कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या भागात मिळालं. पण कटप्पाची भूमिका साकारणाऱ्या सत्यराज यांनी कटप्पाच्या व्यक्तिरेखेसाठी किती रुपये आकारले याचं उत्तर व्हिडीओमध्ये आहे. सत्यराज यांनी सिनेमासाठी 2 कोटी रुपयांचं मानधन घेतलं. तर महत्त्वाकांक्षी राजमाता शिवगामीची भूमिका साकारणाऱ्या रम्या कृष्णाने 'बाहुबली - द कन्क्लुजन' साठी अडीच कोटी रुपये घेतले. पण या सगळ्यात एक अशी व्यक्ती आहे, जिने सिनेमात काम करण्यासाठी सर्वाधिक पैसे घेतले आहेत. ती व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक एस एस राजामौली. होय, राजामौली यांनी सिनेमासाठी सर्वाधिक 28 कोटी रुपये फी घेतली आहे. 'बाहुबली द कन्क्लुजन’ने चार दिवसात केवळ हिंदी भाषेत 168.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकेंडला जबरदस्त गल्ला जमवल्यानंतर सोमवारीही सिनेमाने 40.25 कोटींची विक्रमी कमाई केली. सोमवारी एवढी कमाई करणारा हा पहिलाच हिंदी भाषेत डब करण्यात आलेला सिनेमा आहे. पाहा व्हिडीओसंबंधित बातम्या : सर्व विक्रम मोडीत, ‘बाहुबली 2’ ची विकेंडला ऐतिहासिक कमाई बाहुबली बनवणारे राजमौली कोण?मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन ‘बाहुबली 2’ मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!‘बाहुबली 2’ चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटकपुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’कडे प्रेक्षकांची सपशेल पाठकटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएटरिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलरVIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज