Ayushmann Khurrana: भारतात अनेक लोक क्रिकेटप्रेमी आहेत. सगळी कामे थांबवून क्रिकेट सामना पाहणारे अनेक लोक असतात. काल भारत- पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघानं टी टी 20 विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. नुकतीच अभिनेता आयुष्मान खुरानानं (Ayushmann Khurrana ) एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं चाहत्यांना एक किस्सा सांगितला आहे.
आयुष्मानचं ट्वीट
आयुष्यमाननं ट्वीटमध्ये लिहिलं, 'ही कथा माझ्या भावी पिढ्यांसाठी आहे. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी मी मुंबई-चंदीगड फ्लाइटच्या आत शेवटच्या दोन ओव्हर पाहिल्या. विमानातील सर्व प्रवासी त्यांच्या मोबाईलमध्ये सामना बघत होते. मला खात्री आहे की, क्रिकेटप्रेमी असलेल्या पायलटने जाणूनबुजून फ्लाइटचं टेकऑफ 5 मिनिटे लांबवलं असणार आणि त्याबद्दल कोणत्याही प्रवाशानं तक्रार केली नाही.' आयुष्मानच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. आयुष्मानच्या या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाइक केलं आहे.
आयुष्मानचे आगामी चित्रपट
आयुष्मानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. ड्रीम गर्ल 2 हा आयुष्मानचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात आयुष्मानसोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा डॉक्टर जी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
कलाकारांनी केल्या पोस्ट
आयुष्यामानबरोबरच अनेक कलाकारांनी कालच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आनंद व्यक्त केला. अभिषेक बच्चन, प्रीती झिंटा,जावेद अख्तर, कार्तिक आर्यन, मुनव्वर फारुकी,वरुण धवन, अनुष्का शर्मा या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. तसेच अनेक नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
India Vs Pak T20: 'माझ्यासाठी प्रार्थना करा...'; पाकिस्तानच्या पराभवानंतर अभिनेता ढसाढसा रडला