Doctor G Trailer Out : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आयुष्मानच्या 'डॉक्टर जी' (Doctor G)  या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये आयुष्मानसोबतच अभिनेत्री रकुल प्रीत सिंह देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. आयुष्मान या चित्रपटामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उदय गुप्ता ही भूमिका साकारत आहे. 


स्त्रीरोग तज्ज्ञच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी 'डॉक्टर जी' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला दिसते की,  डॉ. उदय गुप्ता म्हणजेच आयुष्मान हा एका महिलेवर उपचार करत असतो. त्यानंतर त्या महिलेचा पती येऊन आयुष्यमानला मारतो.  ट्रेलरमधील डयलॉग्स आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली आहेत. 14 ऑक्टोबर रोजी 'डॉक्टर जी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षक हा चित्रपट रिलीज होण्याची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


विनीत जैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात आयुष्मान आणि रकुल प्रीत सिंह यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अनुभूती कश्यप यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री शेफाली शहा देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.


पाहा ट्रेलर: 



आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती 


 'विकी डोनर', ‘नौटंकी साला’  ‘हवाईजादा’, ‘दम लगा के हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘दम लगा के हैशा’, ‘अंधाधुंद’, ‘अनेक’ या चित्रपटातील आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  स्टार प्लसचा शो ‘जस्ट डान्स’मध्ये त्याने सूत्रसंचालन केले. 2004 मध्ये आयुष्मान खुराना  एमटीव्हीच्या 'रोडीज' शोमध्ये झळकला होता. या शोचे विजेतेपदही त्याने पटकावले होते.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Happy Birthday Ayushmann Khurrana :  अभिनेताच नाही तर, गायक अन् व्हीजेदेखील आहे आयुष्मान खुराना! वाचा अभिनेत्याविषयी खास गोष्टी...