1920 Horrors Of The Heart Trailer: छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अविका गोर  (Avika Gor)  ही लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. अविका ही कृष्णा भट्टच्या '1920- हॉरर ऑफ द हार्ट' (1920 Horrors Of The Heart) या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी (1 जून) रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


2008 मध्ये रिलीज झालेल्या रजनीश दुग्गल आणि अदा शर्मा यांच्या '1920' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच  '1920 हॉरर ऑफ द हार्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यामध्ये अविका कौर ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कृष्णा भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.हा ट्रेलर शेअर करुन कृष्णा भट्टनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ट्रेलर आला आहे.. भीतीच्या अंधारात असेच काहीसे घडते..'. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. '1920 हॉरर ऑफ द हार्ट'  हा चित्रपट 23 जूनला प्रदर्शित होत आहे.


पाहा ट्रेलर:






अविका गोरनं सोशल मीडियावर '1920 हॉरर ऑफ द हार्ट' (1920 Horror Of The Teart) या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अविकाच्या हातात एक मेणबत्ती दिसत आहे. या पोस्टरला कमेंट करुन अनेकांनी अविकाच्या या आगामी चित्रपटासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 






अविका गोरच्या 'बालिका वधू' (Balika Vadhu) या मालिकेमधील आनंदी या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता ती '1920 हॉरर ऑफ द हार्ट' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.   या चित्रपटातील तिच्या लूकचे सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करत आहेत. अविकानं बालिका वधू, ससुराल सिमर का आणि लाडो वीरपुर की मर्दानी या मालिकांमध्ये काम केलं आहे.


संबंधित बातम्या


Avika Gor : फुलपाखरू... अविका गौरचा ग्लॅमरस अंदाज, फोटो व्हायरल