Avatar 2 Box Office Collection: दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron) यांच्या  'अवतार' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. 'अवतार 2' (Avatar 2) म्हणजेच 'अवतार द वे ऑफ वाटर' (Avatar The Way Of Water)  हा चित्रपट रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला  चांगली कमाई केली असून दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं कलेक्शन...


'अवतार द वे ऑफ वाटर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 


रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 'अवतार 2' ने भारतात 41 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटानं जवळपास 42-43 कोटींची कमाई केली आहे.  दोन दिवसांत या चित्रपटानं जवळपास 83-84 कोटींचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने जगभरात दोन दिवसांमध्ये  1500 कोटींची कमाई केली आहे. 


चित्रपटाची तगडी स्टार कास्ट
'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमात प्रसिद्ध कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सॅम वर्थिंग्टन  जेक सुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.  तसेच जो सलदानादेखील (Zoe Saldana) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट रोनलची भूमिका साकारत आहे. जिओव्हानी रिबिसी, जोएल डेव्हिड मूर, दिलीप राव, मॅट जेराल्ड, जॅक चॅम्पियन, एडी फाल्को, ब्रेंडन कॉवेल, मिशेल येओह आणि जेमेन क्लेमेंट या कलाकारांनी देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. 




'अवतार: द वे ऑफ वॉटर' या चित्रपटानंतर अवतार-3 हा चित्रपट  रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अवतार-3 चं नाव 'द सिड बेअरेर' असं असणार आहे. हा चित्रपट  20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.  तसेच अवतार 4 हा चित्रपट देखील 18 डिसेंबर 2026 रोजी रिलीज होणार असून या चित्रपटाचं नाव 'द कुलकून रायडर' असं असणार आहे. तर अवतार-5 चित्रपटाचं नाव the quest for eywa असं असणार आहे.हा चित्रपट 22 डिसेंबर 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Avatar 2 Leaked: भारतात रिलीजआधी अवतार 2 लीक! काही ऑनलाईन साईट्सवर सिनेमा अपलोड