Avatar 2 Advance Booking : सिनेप्रेमींसाठी सध्या सुगीचे दिवस आहेत. सिने-दिगर्शक जेम्स कॅमेरॉन (James Cameron) तेरा वर्षांनंतर सुपरहिट 'अवतार'चा (Avatar) दुसरा भाग घेवून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. जाणून घ्या या सिनेमासंबंधित महत्त्वाच्या गोष्टी...


'अवतार 2'कधी होणार प्रदर्शित? 


'अवतार' हा सिनेमा 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा अॅनिमेशन सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून या सिनेमाच्या सिक्वेलची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर आता हा सिनेमा उद्या म्हणजेच 16 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'Avatar The Way Of Water'


'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. सॅम वर्थिंग्टन (Sam Wothington) जेक सुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. जो सलदानादेखील (Zoe Saldana) महत्तावाच्या भूमिकेत आहे. टायटॅनिक फेम अभिनेत्री केट विन्सलेट रोनलची भूमिका साकारत आहे. जिओव्हानी रिबिसी, जोएल डेव्हिड मूर, दिलीप राव, मॅट जेराल्ड, जॅक चॅम्पियन, एडी फाल्को, ब्रेंडन कॉवेल, मिशेल येओह आणि जेमेन क्लेमेंट हे कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 




'Avatar 2'चं बजेट काय? 


जेम्स कॅमेरूनचा 'अवतार 2'(Avatar 2) हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाचा पहिला भाग 237 मिलिअन डॉलरमध्ये बनवण्यात आला होता. तर 2009 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जगभरात 20 हजार 268 कोटींची कमाई केली होती. आता 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची निर्मिकी 250 मिलिअन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. रिलीजआधीच या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा जगभरात किती कोटींची कमाई करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 


संबंधित बातम्या


Avatar 2 : 'अवतार : द वे ऑफ वॉटर'ने रिलीजआधीच मोडला 'Doctor Strange 2'चा रेकॉर्ड; भारतात करणार रेकॉर्डब्रेक कमाई!