Takatak 2 : मराठी प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा 'टकाटक' मनोरंजनाचा खजिना खुला झाला आहे. मराठी तिकिटखिकडीवर प्रेक्षक 'टकाटक' मनोरंजनाची जादू अनुभवत आहेत. 'टकाटक 2' (Takatak 2) या मराठी सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यश मिळवलं आहे. याच बळावर 'टकाटक 2'च्या खात्यावर पहिल्या वीकेंडला तब्बल 2.11 कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला आहे. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 18 ऑगस्ट रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच प्रेक्षक गर्दी करत आहेत.


पहिल्या भागाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर 'टकाटक 2'च्या रूपात पुढील भाग प्रदर्शित झाला आहे. सुरेख संकल्पना, आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवादलेखन, लक्षवेधी अभिनय, विनोदामागे दडलेला संदेश, सुमधूर गीत-संगीत रचना, कलात्मक दिग्दर्शन आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या बळावर या चित्रपटानं रसिकांचं मन जिंकलं आहे. महाराष्ट्रातील बर्‍याच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट गर्दी खेचत आहे. याच बळावर 'टकाटक 2'नं 2.11 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 


पहिल्या शोपासूनच या सिनेमानं नेत्रदीपक यश मिळवण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली आहे. दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा सण असतानाही प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्याला प्राधान्य दिलं. शनिवार आणि रविवारी या सिनेमानं सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं. याच बळावर 'टकाटक 2'नं पहिल्या वीकेंडला 2.11 कोटींचा आकडा गाठला आहे. 


आज जिथे हिंदी सिनेमा पाहण्यासाठीही प्रेक्षक सिनेमागृहांकडे वळत नसताना 'टकाटक 2'नं पुन्हा एकदा रसिकांना सिनेमागृहांपर्यंत आणण्याची किमया केली आहे. विशेष म्हणजे पुरुषांप्रमाणेच महिलांनाही या चित्रपटानं मोहिनी घातली आहे. यातील मैत्रीच्या मुद्द्यासोबतच चित्रपटात देण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण संदेशाचे प्रेक्षक तोंड भरून कौतुक करत आहेत. यामुळेच दिवसागणिक 'टकाटक 2' पाहण्याची इच्छा असणारे प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये येत आहेत.


'टकाटक 2'चं दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं असून, संकल्पना-कथा-पटकथा लेखनही त्यांनीच केलं आहे. प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे या कलाकारांनी सिनेमात केलेली धमाल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. संवादलेखन किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी केलं आहे. हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. निलेश गुंडाळे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.


'टकाटक २' निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी, नरेश चौधरी  हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.


संबंधित बातम्या


Takatak 2 : 'अशी ही बनवाबनवी'मधील 'हृदयी वसंत फुलताना...' गाण्याला मॉर्डन टच; टकाटक-2 मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस


Takatak 2 : अभिनेते सुबोध भावेंच्या हस्ते 'टकाटक 2'चा उत्कंठावर्धक ट्रेलर लाँच