Asha Bhosle Grand Daughter Zanai Bhosle : दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची लाडकी नात जनाई भोसले (Zanai Bhosle) सध्या चर्चेत आहे. 'द प्राइड ऑफ इंडिया - छत्रपती शिवाजी महाराज' (The Pride of Bharat Chhatrapati Shivaji Maharaj) या सिनेमाच्या माध्यमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. संदीप सिंह (Sandeep Singh) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 


'द प्राइड ऑफ इंडिया - छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमात जनाई भोसले शिवाजी महाराज यांची पत्नी सई भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जनाई दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात आहे. त्यामुळे तिच्याकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. 




आशा भोसलेंच्या नातीने सौंदर्याच्या बाबतीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मागे टाकलं आहे. जनाई सोशल मीडियावर सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा ती प्रयत्न करत असते. आजवर अनेक म्युझिक अल्बमला तिने आवाज दिला आहे. तिच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये 'तेरा ही एससास है' या गाण्याचा समावेश आहे.


कोण आहे जनाई भोसले? (Who is Zanai Bhosle)


जनाई भोसले ही एक लोकप्रिय गायक, संगीतकार आणि इन्फ्लुअंसर आहे. 6 पॅक या म्युझिक अल्बमसोबत सध्या ती काम करते आहे. हा भारतातला पहिला ट्रांसजेंडर ब्रँड आहे. लोकप्रिय गायिका असण्यासोबत जनाई एक उत्कृष्ट नृत्यांगनादेखील आहे. 2016 मध्ये लंडनच्या 'बर्मिंघम' मधील एका डान्स शोमध्ये ती दिसून आली होती. 




जनाईबद्दल बोलताना 'द प्राईड ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमाचे दिग्दर्शक संदीप सिंह म्हणाले की,"जनाईला लॉन्च करताना मला अत्यंत आनंद होत आहे. गायिका असण्यासोबत ती एक चांगली अभिनेत्री आणि नृत्यांगनादेखील आहे". श्रद्धा कपूरने जनाईला शुभेच्छा देत एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,"आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी माझी बहिण येत आहे". 


'द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज' हा सिनेमा 19 फेब्रुवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. सध्या जनाईच्या बॉलिवूड पदार्पणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.


संबंधित बातम्या


Asha Bhosle Meet Amit Shah : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतली अमित शाह यांची भेट