Aryan Khan Drugs Case: ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानला सध्या मुंबईमधील आर्थर रोड तुरूंगात ठेवण्यात आले आहे. आर्यनला 20 ऑक्टोबरपर्यंत तुरूंगात राहावे लागणार आहे. त्यानंतर त्याच्या जामीनावर  निर्णय होणार आहे. 2 ऑक्टोबरपासून आर्यन अटकेत आहे.  कोरोनामुळे सध्या कैद्यांना त्यांच्या कुटुंबाला तुरूंगात भेटण्याची परवानगी नाही. आर्यनला कुटुंबाला व्हिडीओ कॉल करण्याची नुकतीच परवानगी देण्यात आली आहे.  सुत्रांनुसार, आर्यनने व्हिडीओ कॉलद्वारे वडील शाहरूख आणि आई गौरी खान यांच्यासोबत संपर्क साधला असून त्याने व्हिडीओ कॉलवर बोलण्यासाठी त्याच्या आईचा नंबर दिला. आई आणि वडीलांसोबत तो जवळपास 10 मिनीटे बोलला.  


Aryan Khan Drugs Case: 'आर्यन खान कैदी नंबर-956'; कुटुंबाने तुरूंगात पाठवले 4500 रुपये


कुटुंबासोबत संपर्क साधण्यासाठी कैद्यांना पाळावे लागतात हे नियम 
तुरूंगात एकूण 3200 कैदी आहेत. कोरोना नियमांनुसार कोणताही कैदी तुरूंगात असताना त्याच्या  कुटुंबाला भेटू शकत  नाही. त्यामुळे कैद्यांना त्यांच्या कुटुंबासोबत व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधण्याची परवानगी देण्यात आली आहे. एका कैद्याला त्यांच्या कुटुंबासोबत दहा मिनीट बोलण्याची परवानगी देण्यात येते. हायकोर्टाच्या आदेशानुसार   तुरूंगात असणाऱ्या सर्व कैद्यांना एका आठवड्यातून दोन वेळा आपल्या कुटुंबासोबत बोलण्याची  परवानगी देण्यात आली आहे.



आर्यनच्या कुटुंबाने पाठवले 4500 रूपये 
आर्यनला त्याचा कुंटुंबाने मनी ऑर्डरने 4500 रूपये पाठवले आहेत. 11 ऑक्टोबरला आर्यनसाठी कुटुंबाने हे पैसे पाठवले असून तुरूंगाच्या नियमानुसार कोणत्याही कैद्याला दर महिन्याला  4500 रूपयेच मनी ऑर्डरद्वारे पाठवता येतात. या मनी ऑर्डरचा वापर जेलच्या कॅंटीनमधझील विविध वस्तूंच्या खरेदीसाठी करता येतो.  सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान मनीऑर्डरमधून आलेल्या 4500 रुपयांचा वापर  बिस्किटे आणि पाण्याची बॉटल घेण्यासाठी करत आहे. 


Shahrukh Khan सोबत लग्नानंतरही गौरीनं बदलला नाही धर्म; सांगितलं हे कारण


शांत पण चिंताग्रस्त आहे आर्यन 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन तुरूंगामध्ये चिंताग्रस्त असतो. अनेक वेळ आर्यन शांत बसलेला असतो. तसेच आर्यनला तुरूंगाच्या आधिकाऱ्यांनी वाचण्यासाठी एक मासिक देखील दिले आहे.