Aryan Khan Drugs Case : बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे मुंबईतील आर्थर रोडवरील तुरुंगात अटकेत आहे. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आर्यनला 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे. दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनसोबत संवाद साधला. त्यादरम्यान आर्यन म्हणाला, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर गरिबांची मदत करेल. 


आर्यन खानचे समुपदेशन
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आर्यन खानचे समुपदेशन केले. यादरम्यान आर्यन समीर वानखेडेंना म्हणाला, की "तुरूंगातून सुटका झाल्यानंतर तो गरिबांना मदत करणार आहे". आर्यन पुढे म्हणाला, एक दिवस सर्वांना अभिमान वाटेल असे काम करुन दाखवेन. 


आर्यन खानचा जामीन
20 ऑक्टोबरला होणाऱ्या सुणावणीत आर्यन खानला जामीन मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्यन खानतर्फे अमित देसाई, सतीश मानशिंदे तर एनसीबीकडून अनिल सिंह दाखले देणार आहेत. आर्यनचा ट्रायल नंबर N956 आहे. तुरुंगातील कैद्यांना त्यांच्या नंबरच्या नावाने ओळखले जाते. त्याचमुळे आर्यनला त्याचा कैदी नंबर मिळाला आहे. आर्यन खान तुरुंगात वैतागलेला दिसून येतो. त्याला तुरुंगात मिळणारे जेवण आवडत नसल्याने तो जेवतदेखील नाही. तुरुंगात बाहेरचे जेवण आणण्याची परवानगी नाही. आर्यन तुरुंगात त्याचे घरचे कपडेच घालतो.


आर्यन खानने आई-वडिलांसोबत व्हिडीओ कॉलद्वारे साधला संवाद
आर्यन खानला भेटण्यासाठी गौरी आणि शाहरुखने  तुरुंगात न जाता व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्यासोबत संवाद साधण्याचा निर्णय घेतला. पोलिस अधिकाऱ्याने शाहरुख आणि गौरीची आर्यनसोबत व्हिडीओ कॉलद्वारे बोलणे करुन दिले. या संदर्भात माहिती देताना अधिकारी म्हणाले, आर्यन जवळजवळ 10 मिनिटे त्याच्या पालकांसोबत बोलला. मागील वर्षी कोरोना काळतच तुरुंगात व्हिडीओ कॉलची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे कैद्यांना त्यांच्या कुटुंबासोबत संपर्क साधता येतो. आर्यन खानला 20 ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोडवरील तुरुंगात राहावे लागणार आहे. त्यानंतरच आर्यन खानची सुटका होणार की नाही ते कळणार नाही. नुकताच आर्यन त्याच्या आई-वडिलांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना भावुक होत रडला. आर्यनला त्या अवस्थेत बघून शाहरुख आणि गौरीलादेखील अश्रू अनावर झाले.