Arun Govil Net Worth : लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिलमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा सुरू आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात छोट्या पडद्यावरील 'रामायण' या पौराणिक मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) यांनादेखील उमेदवारी जाहीर करण्यात आल. अरुण गोविल हे साधेपणाने आयुष्य जगतात पण आता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
अरुण गोविल यांनी केवळ टीव्ही मालिकांमध्येच काम केले नाही तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. राजकारणात आलेले अरुण गोविल यांच्याकडे किती मालमत्ता आहे, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
रामायणनंतर मालिका, चित्रपटात काम
अरुण गोविल यांनी रामायणानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'विक्रम और बैताल'पासून ते नुकत्याच आलेल्या 'आर्टिकल 370'पर्यंत त्यांनी मालिका, चित्रपटात काम केले आहे. 1979 साली अरुण गोविल यांचे 'सावन को आने दो' आणि 'साँच को आंच नहीं' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यांचा पहिला चित्रपट 'पहेली' 1977 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर अरुण गोविल यांनी 'लव कुश', 'ससुराल', 'शिव महिमा', 'गंगा धाम', 'जुदाई', 'जियो तो ऐसा जिओ', 'राधा और सीता', 'मुकाबला', 'हुकस बुक्स' हे चित्रपट केले. , 'OMG 2' आणि 'Article 370' आदींमध्ये काम केले.
अरुण गोविल यांचे शिक्षण किती?
अरुण गोविल यांचे सुरुवातीचे शिक्षण मेरठमधून झाले. त्यांनी मेरठच्या चौधरी चरण सिंग विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षणही पूर्ण केले. यानंतर अरुण यांनी नाट्य आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 1975 मध्ये अरुण गोविल मुंबईत आला आणि भावासोबत राहू लागले. यानंतर त्यांना विक्रम-वेताळच्या कथेवर आधारित असलेली मालिका मिळाली. त्यानंतर रामायण मालिकेत प्रभू रामाची भूमिका मिळाली.
अरुण गोविल यांची संपत्ती किती?
मीडिया रिपोर्टसनुसार, अरुण गोविल यांना 'रामायण'च्या प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास 51 हजार रुपये मानधन मिळत होते. रामायणाचे एकूण 81 एपिसोड होते. त्यानुसार, गोविल यांना 40 लाखापेक्षा अधिक मानधन मिळाले. त्यानंतर त्यांनी 'ओह माय गॉड 2'साठी 50 लाख रुपयांचे मानधन घेतले. वृत्तानुसार, अरुण गोविल यांची एकूण संपत्ती 38 कोटी रुपये आहे. 2022 मध्ये त्यांनी सुमारे 60 लाख रुपयांची आलिशान कारही खरेदी केली आहे. याशिवाय त्यांचे मुंबईत एक आलिशान घर आहे.