Armaan Malik Engaged With Youtuber Aashna Shroff : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरमान मलिकने (Armaan Malik) गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत (Aashna Shroff) गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सारखपुडा केल्यानंतर आशनासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 


अरमान मलिकने वयाच्या 28 व्या वर्षी गर्लफ्रेंड आशनासोबत साखरपुडा केला आहे. चाहत्यांसोबत साखरपुड्याची बातमी शेअर करत त्याने खास कॅप्शन लिहिली आहे. त्याने लिहिलं आहे,"आयुष्यभर एकत्र प्रवास करण्याचा अध्याय आता सुरू झाला आहे". अरमानने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो आशनाला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे. तसेच गुडघ्यावर बसून तो तिला लग्नाची मागणी घातल आहे". 


अरमानच्या फोटोवर अभिनंदनाचा वर्षाव 


अरमान मलिकने शेअर केलेले आशनासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी या फोटोवर कमेंट्स करत गायकाचं अभिनंदन केलं आहे. ईशान खट्टरने लिहिलं आहे,"तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा". रिया चक्रवर्ती, ईशा गुप्ता, जरीन खान, नीती मोहन, तारा सुतारिया, अहाना कुमरा, टायगर श्रॉफ या सेलिब्रिटींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 




अरमानची होणारी पत्नी आशना श्रॉफ कोण आहे? (Who Is Aashna Shroff)


आशना श्रॉफ एक लोकप्रिय युट्यूबर आणि ब्लॉगर आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे. फॅशन आणि ब्यूटीसंबंधित व्हिडीओ ती बनवत असते. मीडिया रिपोर्टनुसार, आशना अरमानपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. आशनाने लंडनमधून फॅशनसंबंधित शिक्षण घेतलं आहे. अरमानआधी तिचं नाव फोटोग्राफर सिद्धांतसोबत जोडलं गेलं होतं. आशनाची आई किरण श्यामदेखील मॉडेल होती. 


अरमान मलिकबद्दल जाणून घ्या... (Singer Armaan Malik)


अरमान मलिकने 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'च्या माध्यमातून गायनप्रवासाला सुरुवात केली. 'जहर','बोल दो न जरा','पहला प्यार','मुझको बरसात बना लो','मैं रहूँ या न रहूँ' अशी अनेक सुपरहिट गाणी अरमान मलिकने गायली आहेत. 


अरमान आणि आशना 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली होती. पण अरमान आणि आशनाने त्यांच्या नातं जाहीर करणं टाळलं होतं. आता साखरपुडा करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. 


संबंधित बातम्या


Armaan Malik Chain Snatching: युट्यूबर अरमान मलिकसोबत घडली घटना; गळ्यातील चेन हिसकावून फरार झाले चोर