Arjun Kapoor: बॉलिवूडमध्ये परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूरची स्टारकास्ट असणारा इशकजादे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील परिणीती आणि अर्जुनची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. पण इशकजादे चित्रपटात परिणीतीला घेण्याच्या निर्णयाला अर्जूनचा कडाडून विरोध होता. असं नुकतंच त्यांनं एका मुलाखतीत सांगितलं. इशकजादे चित्रपटात अर्जुनला परिणीती नको होती.याचं कारण सांगताना अर्जून म्हणाला, सेटवर परिणीतीच्या बोलण्यानं चिडचिड व्हायची असं त्यांनं सांगितलं. मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.
इशकजादेच्या सेटवर असतानाचा एक प्रसंग आठवत अर्जुनने परिणीती त्याला सिनेमात का नको होती याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, जेव्हा परिणीती सेटवर आली त्यादिवशी अर्जुन ने काहीतरी जोक केला होता. त्यावर फक्त हसण्याच्या ऐवजी ती gen z lingo मध्ये LOL म्हणाली. यावर मी तिला म्हणालो होतो, तू फक्त हसू शकत नाहीस का? आपण चॅटिंग करत नाही आहोत. त्यामुळे ती फार इरिटेटिंग वाटायची. असं अर्जुन म्हणाला.
सतत इमोजीमध्ये बोलायची, त्यामुळे...
इशकजादे सिनेमात परिणीती आणि अर्जुन कपूर या दोघांची जोडी प्रेक्षकांना भावली होती. यात दोघांच्या रोमांटिक बॉण्डिंगचीही चर्चा होती. पण या सिनेमात परिणीतीला घेऊ नये असं अर्जुनला वाटत होतं. परिणीती सतत इमोजीमध्ये बोलायची. त्यामुळे मला ती या भूमिकेसाठी सिरीयस नसल्याचं वाटायचं. मी सहा महिन्यापासून वाट बघत होतो की झोया कधी मिळते. आणि जो या येऊन LOL LOL करत होती.. असा अर्जुन म्हणाला. तिचं बोलणं ऐकून मला वाटायचं आता माझं करिअर संपलं.. ही मुलगी काही काम करण्यासाठी इंटरेस्टेड नाही..
बॉक्स ऑफिसवर इशकजादेने उडवला दणका
इशकजादे हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. हबीब फैजल लिखित आणि दिग्दर्शित असलेला इशकजादे सिनेमाची यशराज फिल्मच्या बॅनरखाली आदित्य चोप्रा याने निर्मिती केली होती. यात प्रमुख भूमिकेत अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा या जोडीने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात, गौहर खान, नताशा रस्तोगी, अनिल रस्तोगी, शशांक खेतान यांच्यासह अनेक दर्जेदार कलाकारांचा समावेश आहे. 11 मे 2012 रोजी इशकजादे रिलीज झाला होता. या चित्रपटाला सिनेपरीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून वाहवा मिळाली होती. विशेषतः परीनीतीचा उत्कृष्ट कामगिरीचही अनेकांनी कौतुक केलं होतं. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी ठरलेला इशकजादे व्यावसायिकदृष्ट्या ही हिट ठरला आहे.