The Sabarmati Report on OTT: पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शहांनी कौतूक केलेला द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा आता वाढली आहे.गुजरातच्या गोध्रा कांडाची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. कंगुवा चित्रपटाच्या रिलिजनंतर एका दिवसाने म्हणजेच १५ नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलिज झालेली द साबरमती रिपोर्ट या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता ही फिल्म पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. द साबरमती रिपोर्ट लवकरच ओटीटीवर रिलिज होणार आहे.
धीरज सरना दिग्दर्शित 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. विक्रांत मेस्सी याच्यासोबत राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन यांनी केली आहे.
कोणत्या ओटीटीवर येणार द साबरमती रिपोर्ट?
उत्कंठा वाढवणारा ट्रेलर, दमदार स्टारकास्ट आणि गोध्रा कांड या वादग्रस्त विषयाभोवती फिरणारी कथा यामुळे प्रेक्षकांमध्ये सुरुवातीपासूनच द साबरमती रिपोर्ट सिनेमाची चर्चा होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक बड्या नेत्यांनी द साबरमती रिपोर्ट सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद देत कौतूक केल्याचे दिसल्यानंतर प्रेक्षकांना हा सिनेमा ओटीटीवर कधी येणार याचं कुतुहल होतं.द साबरमती रिपोर्ट हा सिनेता ZEE 5 वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट कधी येणार याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी एकूण चित्रपटांचा ट्रेंड पाहिला तर चित्रपटनिर्माते थेएटरमध्ये सिनेमा रिलिज झाल्यानंतर एक ते दीड महिन्यात ओटीटीवर सिनेमा आणतात. डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला द साबरमती रिपोर्ट प्रेक्षकांच्या स्क्रीन्सचं दार ठोठावू शकतो. हा चित्रपट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे . रिलिज झाल्यापासून या चित्रपटाने 10 दिवसांत 18 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे, असा सॅकनिल्कचा अहवाल सांगतो.
द साबरमती रिपोर्टनं बॉक्सऑफीसवर किती केली कमाई?
द साबरमती रिपोर्ट हा गुजरातच्या गोध्रामध्ये घडलेल्या साबरमती एक्सप्रेसला जाळल्याच्या घटनेभोवती फिरते. २७ फेब्रुवारी २००२ रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.आयोध्येवरून परतत असणाऱ्या ५९ यात्रेकरूंचा आणि प्रवाशांचा यात मृत्यू झाला होता.या घटनेने देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संरचनेवर मोठा परिणाम केला होता.