बॉलिवूड अभिनेते अर्जुन कपूरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट लिहीत अर्जुनने ही माहिती दिली. "मला कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याची माहिती तुम्हाला देण्याचे माझं कर्तव्य आहे. माझी तब्बेत पूर्णपणे ठीक असून कोणतीही लक्षणे नसल्याने मी घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी डॉक्टर आणि मुंबई महानगरपालिकेचा सल्ला घेतला आहे.


प्रेम करणे गुन्हा असेल तर रिया अटक व्हायला तयार, रियाच्या वकिलांची माहिती


अर्जुन कपूरने पुढे लिहलंय की, "तुमच्या समर्थनासाठी आगाऊ (एडवान्स) आभार मानतो आणि पुढील काळात माझ्या आरोग्यासंबंधीत सर्व अपडेट्स तुम्हाला देत राहील. मला विश्वास आहे, की पूर्ण मानवता एकत्र येत या व्हायरसला नष्ट करतील. खूप सारे प्रेम अर्जुन" अर्जुनच्या कपूरच्या या पोस्ट वर आयश श्रॉफने लिहले आहे, की, "लवकरचं तू बरा होशील मुला" तर, साकिब सलीम यांनीही अर्जुनसाठी प्रार्थना केली आहे.





अर्जुन कपूरची इंस्टाग्राम पोस्ट


अभिनेत्री हुमा कुरेशी हिनेही अर्जुनसाठी मनासापासून प्रार्थना केली आहे. तर त्याची बहीण जान्हवी कपूरने देखील अर्जुनच्या सुरक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात. याव्यतिरिक्त अर्जुन कपूरच्या चाहत्यांनीही अर्जुन तब्बेतीसाठी प्रार्थना केल्या आहेत.


BREAKING | SSR Suicide Case | सुशांत चरस, गांजा ओढायचा; दीपेश सावंतचा एनसीबीला जबाब