नवी दिल्लीः अभिनेता सलमान खान आणि गायक अरिजीत सिंह यांच्यातील शीतयुद्ध संपल्याचं दिसत आहे. अरिजीत सलमानसाठी कधीच गाणार नाही अशा अफवा होत्या. मात्र आपण सलमानच्या आगामी 'ट्युबलाईट' सिनेमासाठी गाणार असल्याचं स्वतः अरिजीतने सांगितलं आहे.


 

नको तो शिक्का स्वतःवर बसवून घेण्यासाठी आणि घमेंड ठेवण्यासाठी आपण काहीच नाही, असं अरिजीतने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. आपण नेहमीच सलमानसोबत आहोत, शिवाय आगामी 'ट्युबलाईट' सिनेमातही गाणार आहोत, असं अरिजीतने सांगितलं आहे.

 

अरिजीतने सलमानची फेसबुकवर पत्र लिहून जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर दोघांचा वाद चर्चेत आला होता. एका पुरस्कार सोहळ्यात अरिजीतने सलमानवर आक्षेपार्ह भाष्य केलं होतं. सलमानचा 'ट्युबलाईट' सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.