Arbaaz Khan Wedding: अभिनेता अरबाज खानने (Arbaaz khan) मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत (Shura Khan) लग्न केले आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अरबाज आणि शूरा यांच्या निकाह सोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. अशताच आता एका मुलाखतीमध्ये सलीम खान यांनी त्यांचा मुलगा अरबाज याच्या दुसऱ्या लग्नाबाबत सांगितलं आहे.
न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलीम खान यांनी सांगितलं, "या विषयावर चर्चा होण्याची गरज होती असे मला वाटत नाही. तो तरुण, सुशिक्षित आणि प्रौढ आहे. तो स्वतःचे निर्णय घेऊ शकतो. माझ्या परवानगीची गरज नाही. जर तो आनंदी असेल तर इतरांना काहीही फरक पडत नाही. त्याने काही दिवसांपूर्वी सांगितले की तो लग्न करणार आहे आणि मी म्हणालो, ठीक आहे. मला असेही वाटते की कोणाच्याही जीवनात ढवळाढवळ न करणे चांगले आहे कारण त्यामुळे समस्या निर्माण होतात."
पुढे समील खान म्हणाले, "त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या मते हा गुन्हा नाहीये. मी त्यांच्यासाठी आनंदी आहे आणि मी वधू आणि वराला माझे आशीर्वाद दिले आहेत."
अरबाज आणि शूरा यांच्या निकाह सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबानं हजेरी लावली होती. सलमान खान, सोहेल खान, अरहान खान, सलीम खान आणि सलमा खान हे अरबाज आणि शूरा यांच्या निकाह सोहळ्यात उपस्थित होते. अरबाजचा मुलगा अरहान खान आणि सलमान खान यांनी अरबाजच्या लग्नात डान्स देखील केला.
अरबाज खानने त्याच्या निकाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, “माझ्या प्रिय व्यक्तींच्या उपस्थितीत, मी आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे"
अरबाज खान मलायका अरोरासोबत (Malaika Arora) 1998 मध्ये लग्नबंधनात अडकला होता. पण 2017 मध्ये ते विभक्त झाले. मलायका आणि अरबाज यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव अरहान खान आहे.
संबंधित बातम्या:
VIDEO: भावाच्या दुसऱ्या लग्नात भाईजानचा जबरदस्त डान्स; 'दिल दियां गल्लां'वर वहिनीसोबत थिरकला सलमान