AR Rahman Divorce With Saira Banu: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असतं. अशातच एका बॉलिवूड सेलिब्रिटीचं वैयक्तिक आयु्ष्य सध्या चर्चेत आहे. ऑस्कर विजेता एआर रहमान (AR Rahman) त्याची पत्नी सायरा बानूपासून (Saira Banu) विभक्त होत असून दोघांनी घटस्फोट घेण्याचं ठरवलं आहे. 29 वर्षांच्या सुखी संसारानंतर आपलं वैवाहिक जीवन संपवून दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. लग्न मोडण्यामागे दोघांची काही वैयक्तिक कारणं असल्याची माहिती मिळत आहे. एआर रहमान आणि सायरा बानो यांच्या घटस्फोटाची कार्यवाही सुरू असून अजून अंतिम प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अशातच दोघांच्या वकील वंदना शाह यांनी घटस्फोटानंतर त्यांच्या मुलांची कस्टडी कुणाकडे जाणार? यावर एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. 


एआर रहमान आणि सायरा बानू यांच्या मुलांच्या कस्टडीबाबत वंदना शाह (Vandana Shah) यांनी विक्की लालवानी (Vicky Lalwani) यांच्याशी यूट्यूब चॅनलवर (You Tube Channel) चर्चा केली. दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर मुलांचा ताबा कोणाला मिळणार? असा सवाल वंदना यांना विचाण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना वकिलांनी सांगितलं की, अद्याप दोघांच्या घटस्फोटाची कार्यवाही पूर्ण झालेली नाही. दरम्यान, त्यांनी सांगितलं की, त्यांची काही मुलं प्रौढ आहेत. ते स्वत: निर्णय घेण्यास मोकळे आहेत, त्यामुळे त्यांची मुलं त्यांना कोणासोबत राहायचं आहे, याचा निर्णय घेऊ शकतात.




मुलांच्या कस्टडीबाबत वकील काय म्हणाल्या?


हिंदुस्तान टाईम्सच्या हवाल्यानं त्यांनी म्हटलं की, "नेमकी मुलांची कस्टडी कायद्यानं कुणाकडे असेल, अजून यावर निर्णय झालेला नाही... यावर अजून निर्णय व्हायचा आहे... पण त्याची मुलं प्रौढ आहेत, ते कोणासोबत राहायचं याचा निर्णय स्वतः घेण्यास सक्षम आहे." याच मुलाखतीत वंदना यांना घटस्फोटादरम्यान झालेल्या करारात दिलेल्या पोटगीबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर भाष्य करणं त्यांनी टाळलं. मात्र, दोघेही आपसी सहमतीनं वेगळे होत आहेत, त्यांनी पैशासाठी हा निर्णय घेतलेला नाही, असं त्यांनी आवर्जुन म्हटलं. 


याशिवाय वकील वंदना यांनी दोघांमध्ये येत्या काळात काही समेट होईल, याची शक्यता नसल्याचं नाकारलं. त्या म्हणाल्या की, "मी असं म्हटलेलं नाही की, सलोखा शक्य नाही." त्यांच्या वकिलानं पुढे सांगितलं की, संयुक्त निवेदन अतिशय स्पष्ट आहे, कारण ते वेदना आणि वेगळेपणाबद्दल स्पष्टता देतं. वंदना पुढे म्हणाल्या की, "दोघांचा जोडीदार म्हणून 29 वर्षांचा मोठा प्रवास आहे, आणि या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप विचार केला गेला आहे, परंतु मी कुठेही समेट शक्य नाही असं म्हटलेलं नाही."


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bollywood Actress Life: सलमान खानच्या 'या' हिरोईनचा जडला गँगस्टरवर जीव; करिअर बरबाद झाल्यानंतर बनली साध्वी, ओळखलं का कोण?