पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली.
या पार्टीत अनुष्का शर्माची साडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. अनुष्काची ही साडी वाराणसीच्या पीलीकोठीच्या कारागीरांनी बनवली.
अनुष्काची साडी आणि ज्वेलरीचं डिझाईन सब्यासाची केलं असून, त्यांनी त्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
तोंडात नोट घेऊन अनुष्काचा डान्स
दरम्यान, या पार्टीत अनुष्काने केलेला डान्सही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अनुष्काने तोंडात नोट घेऊन डान्स केला. रिसेप्शननंतर विराट आणि अनुष्का डान्स फ्लोअरवर आले. गाण्याच्या तालावर दोघांनी चांगलाच ठेका धरला. अनुष्काने तर तोंडात नोट पकडून डान्स केला.
शिखर धवनचाही ठेका
या पार्टीत बहुतेकांनी डान्स केला. टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शिखर धवननेही मौजा ही मौजा गाण्यावर डान्स केला.
दरम्यान, अनुष्का-विराटची आणखी एक रिसेप्शन पार्टी मुंबईत होणार आहे. 26 डिसेंबरला ही पार्टी असून, बॉलिवूड स्टार्स आणि टीम इंडियाचे सदस्य या पार्टीला उपस्थित असतील.