मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. विराट कोहलीने 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली होती.
विराटनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे, असं विराटनं म्हटलं आहे.
अनुष्का गरोदरपणातही योगा आणि वर्कआउट करताना दिसून येत होती. अनुष्का सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन तिच्या गरोदरपणाचा प्रवास तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत होती. यादरम्यान अनुष्काने प्रसिद्ध वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. ते फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अनुष्का गरोदर असल्याची घोषणा
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे विराट कोहलीने अनुष्का गरोदर असल्याी माहिती दिली होती. विराट आणि अनुष्काबद्दल हा खुलासा झाल्यानंतर दोघही ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात झाली होती. आता 'विरुष्का'च्या मुलगी आगमन झालं असून सर्वजण तिची पहिली झलक पाहण्यास आतूर आहेत.