नवी दिल्ली : अभिनेत्री अनुष्का शर्माने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या प्रवाशांना चांगलाच दम दिला. अनुष्का कारमधून प्रवास करत असताना समोरच्या कारमधून पाण्याची रिकामी बाटली बाहेर फेकण्यात आली. त्यावर संताप व्यक्त करत अनुष्काने त्यांना दमही दिला आणि पुन्हा असं न करण्याची तंबीही दिली.


अनुष्का विराट कोहलीसह आपल्या कारने दिल्लीत प्रवास करत होती. तेव्हा समोरच्या गाडीतील व्यक्तीने रिकामी पाण्याची बाटली बाहेर फेकली. हे पाहून चिडलेल्या अनुष्काने त्या गाडीतील युवकाला भररस्त्यात खूप झापलं. विराटने या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला.

या व्हिडीओत अनुष्का आलिशान कारमधील युवकाला झापताना आणि तंबी देताना दिसत आहे. अनुष्काने आपल्या कारच्या काचा खाली घेऊन तरुणाला बाटली रस्त्यावर फेकल्याबद्दल सुनावलं. तुम्ही रस्त्यावर कतरा का फेकता आहात? तुम्ही प्लास्टिकची बाटली का फेकली? यापुढे लक्षात ठेवा, तुम्ही रस्त्यावर अशाप्रकारे प्लास्टिकची बाटली फेकू शकत नाही, असं अनुष्काने कचरा फेकणाऱ्या तरुणाला सुनावलं.

विराट कोहलीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसंच विराटनेही महागड्या गाड्यांमध्ये फिरुन रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या तरुणांवर निशाणा साधला आहे.

विराटचं ट्वीट

https://twitter.com/imVkohli/status/1007952358310055937