मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या आगामी सुलतान या चित्रपटातील नववधूचा लूक नुकताच रिलीज झाला. सलमान खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून या चित्रपटातील सच्ची-मुच्ची या गीतात अनुष्का या नव्या लूकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 6 जुलै रोजी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
अनुष्का या गाण्यात हरयाणी पेहरावातील नववधूच्या रुपात दिसते आहे. अनुष्काने या गाण्यासाठी परिधान केलेल्या ड्रेसमध्ये सुंदर नक्षी रेखाटण्यात आली असून त्यात कुंदन, गोट आदींचा वापर करण्यात आला आहे.
ती या चित्रपटासाठी खुपच ऐक्सायटेड असून, ती पहिल्यांदाच महिला पैलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिचे नाव आरफा, असल्याचे तिने सांगितले. या गाण्यासाठी दिवानी कलेक्शनच्या टीमने हा लग्नातील ड्रेस बनवला असल्याचेही तिने सांगितले.