पुणे : एफटीआयआयचे नुतन अध्यक्ष अनुपम खेर यांनी दुपारी कॅम्पसमध्ये अचानक एन्ट्री घेतली. त्यांची ही एन्ट्री विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी आश्चर्यकारक होती. मात्र, अनुपम खेर यांच्या वागणुकीने सर्वांसाठीच हा सुखद धक्का ठरला.
अनुपम खेर यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या, त्यांचा क्लास घेतला आणि त्यांच्याबरोबर मेसमध्ये जेवणही केलं. शिवाय त्यांनी कर्मचाऱ्यांचीही आपुलकीने विचारपूस केली.
कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यानंतर संस्थेच्या प्रवेशद्वारापासूनच चालत सुरुवात केली. ते जसे अचानक एफटीआयआयमध्ये आले, तसेच एका वर्गावर अचानक जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांचा क्लासही घेतला. चालतच त्यांनी एफटीआयआयच्या वेगवेगळ्या विभागांना भेट दिली.
या संस्थेत मी विद्यार्थी म्हणून शिकलो आहे. त्यामुळे अध्यक्ष झालो असलो तरी, इथे विद्यार्थी म्हणूनच यायला मला आवडेल. विद्यार्थी शिकायलाच येतात. त्यात त्यांना काही अडचणी असतील तर नक्कीच सोडवायला हव्यात, असं अनुपम खेर यांनी सांगितलं.
दरम्यान अनुपम खेर यांच्या पहिल्याच भेटीनंतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणाऱ्या नवनिर्वाचित अध्यक्षाटं विद्यार्थ्यांनी स्वागतही केलं.
गजेंद्र चौहान यांच्यानंतर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष म्हणून अनुपम खेर यांची निवड करण्यात आली आहे. गजेंद्र चौहान यांच्या निवडीला विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला होता. मात्र अनुपम खेर यांचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं.
अनुपम खेर यांची एफटीआयआयमध्ये सरप्राईज एंट्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2017 04:58 PM (IST)
गजेंद्र चौहान यांच्यानंतर एफटीआयआयचे नवे अध्यक्ष म्हणून अनुपम खेर यांची निवड करण्यात आली आहे. गजेंद्र चौहान यांच्या निवडीला विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला होता. मात्र अनुपम खेर यांचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -