Ankita Lokhande on Sushant Singh Rajput : बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) अनेकदा दिवंगत अभिनेता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य करत असते. सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमात अभिनेत्रीने अनेकदा सुशांतबद्दल भाष्य केलं आहे. त्यामुळे तिला ट्रोलदेखील करण्यात आलं आहे. 


अंकिता लोखंडेच्या सासूबाई रंजना जैन यांनीदेखील म्हटलं होतं की,"अंकिता लोखंडे लक्षवेधी राहण्यासाठी वारंवार सुशांत सिंह राजपूतचं नाव घेत आहे. सुशांतबद्दल भाष्य केल्याने अंकिताला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. यासंदर्भात अभिनेत्रीने नुकतचं एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. 


झूमला दिलेल्या मुलाखतीत अंकिता लोखंडे म्हणाली की सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलण्यापासून कोणीही मला थांबवू शकत नाही. अंकिता म्हणाली,"मला असं वाटतं, माझं आयुष्य मी कसं जगायचं हे मी ठरवेल. मला एखादा व्यक्ती चांगला वाटत असेल तर त्याच्याबद्दल बोलायला मला कमीपणा वाटत नाही". 


सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलत राहणार : अंकिता लोखंडे


अंकिता पुढे म्हणाली,"सुशांत सिंह राजपूतचं नाव घेण्यास मला कोणाही थांबवू शकत नाही. मी माझ्या मर्जीने त्याच्याबद्दल बोलते. तरीही लोकांना बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. तो त्यांचा निर्णय असेल. पण मी सुशांत सिंह राजपूत बद्दल बोलतच राहणार". 


सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाला चार वर्षे झाली. पण तरीही हत्या की आत्महत्या हे गूढ कायम आहे. सुशांत आज हयात नसला तरी चाहत्यांच्या मनात तो जिवंत आहे. अभिनेत्याच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याचं म्हटलं जात आहे.


अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांची पहिली भेट 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर झाली. या मालिकेच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अनेक वर्षे ते रिलेशनमध्ये होते. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला होता.


अंकिताच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या.. (Ankita Lokhande Upcoming Project)


अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमाची ती विजेती ठरली होती. अंकिताचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसणार आहे. हा सिनेमा 22 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


संबंधित बातम्या


Kangana Ranaut : मलाही सुशांत सिंहसारखं टोकाचं पाऊल उचलावं असं वाटतं होतं; कंगनाचं कोर्टात वक्तव्य