Ankita Lokhande Emotional Post: अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande) वडिलांचे 12 ऑगस्ट रोजी निधन झाले. अंकिता लोखंडेनं नुकतीच तिच्या वडिलांबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अंकितानं तिचे वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले.
अंकिताची पोस्ट
अंकितानं पोस्टमध्ये लिहिलं, 'नमस्कार बाबा मी तुमचे वर्णन शब्दात करू शकत नाही पण मला सांगायचे आहे की, मी माझ्या आयुष्यात तुमच्या इतका स्टाँग, उत्साही माणूस पाहिला नाही. तुम्ही मला सर्वोत्कृष्ट आयुष्य, उत्तम आठवणी आणि नातेसंबंधांची समज दिली. तुम्ही मला कधीही हार मानायला शिकवले नाही. तुम्ही मला उडण्यासाठी पंख दिले. मी तुम्हाला कधीही जाऊ देणार नाही कारण तुम्ही माझ्या आत्म्याचा भाग आहात. तुम्ही मला दिलेल्या संधीबद्दल मी आभारी आहे. मी आणि मम्मा गेल्या 3 दिवसांपासून फक्त विचार करत होतो की, आता काय करायचे. पप्पांचे जेवण, पप्पांची फळे, पप्पांचा नाश्ता वगैरे वगैरे या गोष्टींचा विचार आम्ही करायचो पण आता आमच्याकडे काहीच उरले नाही कारण तुम्ही आम्हाला सोडून गेला आहात.'
'आम्हांला स्ट्राँग बनवल्याबद्दल धन्यवाद आणि हो तुम्ही भाग्यवान आहात कारण तुम्हाला माझ्या आईसारखी बायको मिळाली. तिने तुम्हाला तिच्याकडे असलेले सर्व काही दिले. मला माहित आहे की तुम्ही तिच्यावर खूप प्रेम केले. मी तुम्हाला वचन देते की, आम्ही सर्व तिची जास्त काळजी घेऊ, मी तुम्हाला वचन देतो की, मी तिला आनंद देईन. मी वचन देतो की, मी तिचे पूर्वीपेक्षा जास्त लाड करीन जसे तुम्ही करत होता.'
अंकिताला 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. ही मालिका 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेत अंकितासोबतच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. अंकितानं बागी 3 आणि मणिकर्णिका या चित्रपटांमध्ये काम केलं. 'कॉमेडी सर्कस', 'एक थी नायका' आणि 'झलक दिखला जा' या कार्यक्रमामध्ये अंकिता सहभागी झाली. अंकिता लोखंडेनं विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली.
संबंधित बातम्या
Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेला पितृशोक; वयाच्या 68 व्या वर्षी वडिलांचे निधन