अर्जुन कपूरने काय ट्वीट केलं?
अभिनेता अर्जुन कपूरने फॅमिली फोटो ट्विटरवर शेअर केला. त्यामध्ये अनिल कपूर, संजय कपूर, बोनी कपूर, हर्षवर्धन कपूर, अर्जुन कपूर, श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली यांसह अर्जुन कपूरची भावंडं आहेत. या फोटोत केवळ अनिल कपूर यांनी गॉगल घातला आहे. हाच धागा पकडत अर्जुन कपूर यांनी म्हटलंय की, "आम्हाला कुणालाच माहित नाहीय की, अनिल कपूर यांनी फॅमिली फोटोत सनग्लासेस का घातले आहे. कदाचित त्यांना असे सांगायचे असेल की, आम्ही सगळे त्यांचे चाहते आहोत."
अर्जुन कपूर याच्या ट्वीटला अभिनेते अनिल कपूर यांनीही अगदी दिलखुलासपणे रिप्लाय दिला. आपल्या खास 'झक्कास' स्टाईलमध्ये अनिल कपूर यांनी अर्जुनचं ट्वीट कोट-रिट्वीट करत म्हटले, "बिकॉज, मेनू काला चश्मा जज्दा है, चाचू!"
रक्षाबंधनानिमित्त कपूर फॅमिली एकत्र जमली होती. अर्जुन कपूर, हर्षवर्धन कपूर यांची सगळी भावंडं एकत्र होतीच, सोबत अनिल कपूर, संजय कपूर आणि बोनी कपूरही हजर होते.