Ananya Panday: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अनन्यानं काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी अनन्यानं खास लूक केला होता.  पिंक कलरचा ड्रेस, पिंक कलरचे हिल्स आणि हातात बादलीच्या आकाराची बॅग असा लूक अनन्यानं कार्यक्रमासाठी केला होता. सध्या सोशल मीडियावर अनन्यानं कार्यक्रमात कॅरी केलेल्या हँड बॅगची चर्चा होत आहे. अनन्याला काही जण ट्रोल देखील करत आहेत. 


अनन्या पांडे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचली होती. जिथे तिच्या ऑल पिंक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी अनन्याने पिंक कोट आणि सॅम स्टॉकिन्ससोबत पिंक हिल्स परिधान केले होते.  पण तिच्या गोल्डन बकेट स्टाइल बॅगनं अनेकांचे लक्ष वेधले. अनन्यानं तिच्या या बॅगसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करत काही नेटकऱ्यांनी अनन्याला ट्रोल केलं. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 


अनन्याच्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'दाल तडक्याची बादली' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'त्या पर्सची साइज अनन्याच्या स्ट्रगल एवढीच आहे.' तर एका युझरनं अनन्याच्या फोटोला कमेंट केली, 'लोटा पार्टी करायला चालली आहे.'






अनन्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून काही नेटकरी अनन्याचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडत आहेत.  काही दिवसांपूर्वी आदित्य आणि अनन्या यांनी लॅकमे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक देखील केला. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला. काही दिवसांपूर्वी अनन्याचा 'लायगर'  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. अनन्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


अनन्याचा लवकरच ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  'ड्रीम गर्ल- 2' मध्ये आयुष्मान खुराणा,  परेश रावल, राजपाल यादव, असरानी, ​​विजय राज, अन्नू कपूर, सीमा पाहवा, मनोज जोशी, अभिषेक बनर्जी आणि मनजोत सिंह हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Ananya Panday: बहिणीच्या मेहंदी सोहळ्यात सिगारेट ओढली; अनन्याचा व्हायरल फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या