Anant Ambani and Radhika Merchant : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या लग्नाची प्रचंड चर्चा सुरु होती. हे लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. देश-विदेशातील दिग्गज नेते मंडळी, कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींनी अंबानींच्या या ग्रँड सोहळ्याला हजेरी लावली. या दोघांच्या लग्नानंतर आता त्यांच्या हनिमूनीची चर्चा रंगली आहे. अनंत-राधिकाच्या हनिमूनचा प्लॅन सध्या टळला असल्याचं बोललं जात आहे.
नवविनाहित अनंत-राधिकाचं हनिमून टळलं?
अनंत-राधिकाचा 12 जुलैला शाही विवाह सोहळा पार पडला. राधिकाने अनंतची पत्नी आणि अंबानी कुटुंबाची धाकटी सून बनून गृहप्रवेश केला. आता या दोघांचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर या कपलच्या हनिमूनची जोरदार चर्चा रंगली आहे. अनंत-राधिका हनिमूनसाठी रोमँटिक ठिकाणी जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशातच, आता या कपलच्या हनिमूनचा प्लॅन टळला असल्याचं सांगितलं जात आहे.
हनिमून डेस्टिनेशनबाबत अनेक तर्क-वितर्क
नवविवाहित अनंत-राधिकाच्या हनिमून डेस्टिनेशनबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मीडिया रिपोर्टनुसार, अनंत-राधिका रोमँटिक हनिमूनसाठी फिजी आयलँडवर जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर काहींच्या मते, दक्षिण आफ्रिकाही या प्लॅनचा भाग असू शकते. ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, बोरा बोरा आयलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, फिजी आयलंड, यासोबतच अनेक हनिमून डेस्टिनेशनसाठी ही नावे पुढे येत होती. मात्र, आता बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, अनंत आणि राधिका यांचा लग्नानंतर लगेचच हनिमूनला जाण्याचा प्लॅन पुढे ढकलण्यात आला आहे. लग्नानंतरचे विधी पूर्ण करून हे जोडपे हनिमूनला जाणार आहेत.
हनिमून पुढे ढकलण्यामागचं कारण काय?
मीडिया रिपोर्टनुसार, 'अनंत आणि राधिका दोघेही पारंपारिक गुजराती कुटुंबातील आहेत. त्यामुळे वधू आणि वर दोघांच्याही घरी लग्नानंतरचे अनेक विधी होतील, ज्यामध्ये दोन्ही कुटुंबांचा सहभाग असेल. लग्नानंतर अनेक सेवा आणि दान, याशिवाय काही विशेष पूजा विधी पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रम आणि विधांमध्ये अनंत आणि राधिका व्यस्त असतील. त्यामुळे सर्व विधी आणि कार्यक्रम पार पडल्यानंतरच हे कपल त्यांच्या हनिमूनला रवाना होतील, असं सांगितलं जात आहे. मात्र, नवविवाहित जोडप्याच्या हनिमूनबाबत अंबानी कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
अनंत-राधिकाच्या शाही विवाहाचा थाट
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री-वेडिंग फंक्शन या वर्षी मार्चमध्ये जामनगरमधून सुरू झालं. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी दुसरं प्री-वेडिंग फंक्शन पार पडलं. यानंतर जुलैमध्ये सर्व पारंपरिक विधी पार पाडल्यानंतर 12 जुलै रोजी या दोघांनी गुजराती रितीरिवाजात लग्न केलं. अनंत आणि राधिका आता अधिकृतपणे पती-पत्नी बनले असून त्यांच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :