आयपीएल उद्घाटन सोहळ्यात एमीचा डान्स, सोशल मीडियावर खिल्ली
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2017 04:05 PM (IST)
मुंबई: आयपीएलच्या 10व्या पर्वाची सुरुवात काल हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झाली. यावेळी रंगारंग सोहळाही पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सननं देखील स्पेशल परफॉर्मन्स दिला. पण सोशल मीडिया यूजर्सला तिचा डान्स काही आवडला नाही. एवढंच नाही तर एमीच्या परफॉर्मन्स सुरु असतानाच तिला सोशल मीडियावर ट्रोल करणं सुरु झालं. त्यामुळे ती बराच वेळ ट्विटरवर ट्रेंड देखील होत होती. एका ट्विटनुसार, 'एमी जॅक्सनचा डान्स फारच निराशाजनक होता. तिचा डान्स पाहून 28 डान्स शिक्षकांनी आपली अकादमी बंद केली आणि ते काशीला निघून गेले.' अशा पद्धतीनं तिला ट्रोल करण्यात आलं. 'आयपीएलपेक्षा एमीलाचा या डान्सचा जास्त फायदा होईल.' असा खोचक ट्विट एका यूजरनं केला. दरम्यान, दुसऱ्या ट्विटमध्ये असं म्हटलं गेलं की, 'एमी तुला डान्स करता येत नाही'