Amruta Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांनी नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी नेटकऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


अमृता फडणवीसांनी शेअर केला व्हिडीओ


So Beautiful, So Elegant Just Looking Like A Wow! हा सोशल मीडिया ट्रेंड अनेकांनी फॉलो केला. हा ट्रेंड आता अमृता फडणवीस यांनी देखील फॉलो केला आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या  'So Beautiful, So Elegant Just Looking Like A Wow!  Happy New Year', असं म्हणताना दिसत आहेत. 


पाहा व्हिडीओ:






जास्मिन कौरनं सुरु केला ट्रेंड


जास्मिन कौर यांच्या ‘So Beautiful, So Elegant, Looking Like Wow’ या डायलॉगनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. वेगवेगळ्या प्रकारच्या सूट्सची विक्री करण्यासाठी जास्मिन कौर या व्हिडीओ शेअर करत असतात. त्यापैकी एका व्हिडीओमध्ये त्या हा डायलॉग म्हणाल्या. त्यानंतर त्यांच्या या डायलॉगचा ट्रेंड अनेकांनी फॉलो केला. हा ट्रेंड अभिनेत्री दीपिका पादुकोणनं देखील फॉलो केला.






अमृता फडणवीस यांची गाणी


अमृता फडणवीस या सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. अमृता फडणवीस  या त्यांच्या गाण्यांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांना देतात. काही दिवसांपूर्वी त्यांचे "तुम्हें आईने की जरुरत नहीं" हे  गाणे रिलीज झाले होते. तसेच  अमृता फडणवीस या  सोशल मीडियावर त्यांच्या विविध लूकमधील फोटो आणि विविध गाण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.   मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी देखील अमृता यांनी गायली आहेत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Amruta fadnavis New Song: "तुम्हें आईने की जरुरत नहीं"; अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज