Amruta Deshmukh And Prasad Jawade: 'पुण्याची टॉकरवडी' अशी ओळख असणारी अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि अभिनेता प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांचा लग्नसोहळा आज पार पडला आहे. कुटुंबातील सदस्य तसेच मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये अमृता आणि प्रसाद यांनी लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या हळद आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अमृता आणि प्रसाद यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अमृता आणि प्रसाद यांनी लग्नसोहळ्यासाठी केला खास लूक (Amruta Deshmukh And Prasad Jawade Wedding)
अमृता आणि प्रसाद यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी खास लूक केला होता. अमृतानं लाल रंगाची साडी, गोल्डन ज्वेलरी, नाकात नथ असा लूक विविह सोहळ्यासाठी केला होता. तर प्रसादनं पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि लाल रंगाची टोपी असा लूक केला होता.
अमृता आणि प्रसाद यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघे एकमेकांना घालताना दिसत आहेत. यावेळी अमृता ही लाल लेहंगा आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसली तर प्रसाद हा व्हाईट शेरवानी आणि डोक्यावर पांढरा फेटा अशा लूकमध्ये दिसला.
व्हिडीओला दिलं खास कॅप्शन
अमृता आणि प्रसाद यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याच्या व्हिडीओला खास कॅप्शन दिलं आहे. लग्नसोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन अमृता आणि प्रसाद यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मॅचिकल डेट 18/11/2023 !"अमृता आणि प्रसाद यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स करुन अनेक नेटकऱ्यांनी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
थाटात पार पडला संगीत सोहळा
अमृता आणि प्रसाद यांच्या मेहंदी, हळद आणि संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये अमृता आणि प्रसाद यांचे मित्र-मैत्रिणी तसेच कुटुंबातील सदस्य डान्स करताना दिसले. अमृता आणि प्रसाद यांनी संगीत सोहळ्यात रोमँटिक गाण्यावर डान्स केला.
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात असतानाच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
संबंधित बातम्या