करीनाच्या प्रेग्नन्सीवर सैफच्या पहिल्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2016 07:20 AM (IST)
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री करीना कपूरच्या प्रेग्नन्सीची जोरदार चर्चा आहे. स्वत: सैफ अली खाननेही या करीनाच्या प्रेग्नन्सीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. करीना आणि मी लवकरच आई-बाबा बनणार असून येत्या डिसेंबर महिन्यात आमच्या पहिल्या बाळाचं आगमन होणार आहे. करीना कपूर पहिल्यांदाच आई होणार असली तर सैफ आधीच दोन मुलांचा बाबा आहे. पहिली पत्नी अमृता सिंह आणि त्याला इब्राहिम आणि सारा ही दोन मुलं आहेत. आता करीनाच्या प्रेग्नन्सीबाबत समजल्यावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावर होत आहे. पण यावर सैफची पहिली पत्नी अमृताची काय प्रतिक्रिया आहे, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.