Amitabh Bachchan Shah Rukh Khan Work After 17 Years : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) दोघांचाही जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. दोघांचाही चाहतावर्ग त्यांच्या कलाकृतींची आतुरतेनं वाट पाहत असून मनोरंजनविश्वात त्यांची चांगलीच क्रेझ आहे. आता 17 वर्षांनी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 


'कभी अलविदा ना कहना' (Kabhi Alvida Naa Kehna) या सिनेमात अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान एकत्र झळकले होते. 2006 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर एकाही सिनेमात ते एकत्र झळकले नाहीत. पण आता आस्क एसआरके (Ask Srk) या सेशनमध्ये शाहरुखने खुलासा केला आहे की,"17 वर्षांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना मजा आली".


शाहरुख खानने लिहिलं आहे,"इतक्या वर्षांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना मजा आहे. ते चित्रीकरणासाठी आले होते. दरम्यान त्यांनी आशीर्वाद दिला. त्यांनी मला शर्यतीत हरवले आहे हेदेखील मला तुम्हाला सांगायचं आहे". 






बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या दोन्ही सुपरस्टार्सने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता त्यांचे चाहते पुन्हा एकदा दोघांना एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख आणि बिग बी नक्की कोणत्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे अद्याप समोर आलेलं नाही.


शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन एकत्र स्क्रीन शेअर करणार ही मनोरंजन क्षेत्रासाठी मोठी बातमी आहे. 'मोहब्बतें', 'कभी खुशी कभी गम' आणि 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या सुपरहिट सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ते सज्ज आहेत. 


शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन 'डॉन 3' (Don 3) या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र स्क्रीन शेअर करू शकतात. शाहरुख खान सध्या तरी 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन एटलीने केलं आहे. या सिनेमात शाहरुख खान दीपिका पादुकोण, नयनतारा, प्रियामणी, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोवरसोबत झळकणार आहे. तर अमिताभ बच्चन सिनेमागृहात धुमाकूळ घालत असलेल्या 'घूमर' (Ghommer) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तसेच 'कौन बनेगा करोडपती' हा त्यांचा कार्यक्रमही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan: 'जर ट्रेलर खराब असेल तर सिनेमा बघायचा की नाही?' चाहत्याच्या प्रश्नाला किंग खाननं दिलं उत्तर