Amrita Singh Birthday Special : 90 च्या दशकात अनेक स्टार्स झाले, ज्यांच्या स्टारडमची चव अद्याप इतर कुणालाही चाखता आली नाही. आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिची 80 आणि 90 च्या दशकात खूप चर्चा होती, जिची प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ तितकीच चर्चेत होती. 20 वर्षीय तरुणाशी लग्न, घटस्फोट, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअर आणि क्रिकेटरसोबत साखरपुडा, अशा अनेक कारणांमुळे ही अभिनेत्री चर्चेत होती. 80-90 च्या दशकात या अभिनेत्रीचा बोलबाला होता. ही अभिनेत्री म्हणजे अमृता सिंह. 90 च्या दशकात अभिनेत्री अमृता सिंहने तिचं सौंदर्य आणि अभिनयाने सर्वांना मोहित केलं होतं.

32 वर्षीय अभिनेत्रीनं 20 वर्षीय तरुणाशी गुपचूप उरकलं लग्न

अभिनेत्री अमृता सिंह हे 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक नाव. 90 च्या दशकात अमृता सिंहचा स्टारडम होता. या अभिनेत्रीच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच तिचं वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिलं. अमृता सिंहने अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि सनी देओल यांच्यासारख्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलं. ती तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली होती. अमृता सिंह आणि विनोद खन्ना यांच्या अफेअरचीही चर्चा झाली, याशिवाय, सनी देओलसोबतही तिचं नाव जोडलं गेलं. 32 वर्षीय अमृताने तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत लग्न केल्याने ती सर्वाधिक चर्चेत आली होती.

12 वर्षांनी लहान सैफच्या प्रेमात वेडी होती अमृता

अभिनेत्री अमृता सिंह आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या जोडीची सर्वाधिक चर्चा झाली. अमृता सिंह 12 वर्षांनी लहान सैफ अली खानच्या प्रेमात वेडी होती. सैफ आणि अमृताच्या रिलेशनशिपची सुरुवात झाली, तेव्हा अमृता बॉलिवूडमधील मोठी स्टार होती, पण सैफचा डेब्यूही झाला नव्हता. त्यांची पहिली भेट एका फोटोशूटसाठी झाली होती.

कुटुंबियांना लग्नाचा थांगपत्ताही नाही अन् घटस्फोटापर्यंत पोहोचली गोष्ट

अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची पहिली भेट 'ये दिल्लगी'च्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या फोटोशूटसाठी दोघे पहिल्यांदा भेटले. फोटोशूटवेळी सैफने अमृताच्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा अमृता त्याच्याकडे रागाने पाहत होती. कारण, त्यावेळी अमृता टॉपची अभिनेत्री होती आणि सैफपेक्षा खूप सिनीयरही होती. त्यानंतर त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि त्यांनी लग्न केलं.

अमृता सिंह आणि सैफ अली खान यांचं नातं

1991 मध्ये अमृता सिंह आणि सैफ अली खान यांनी कुटुंबियांना न सांगता गुपचूप लग्न केलं. लग्नावेळी अमृता सिंह 32 वर्षांची तर सैफ अली खानचं वय केवळ 20 वर्ष होतं. लग्नानंतर 13 वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. याचं कारण सैफचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असल्याचं सांगितलं जातं. 2004 मध्ये अमृता सिंह आणि सैफ अली खान यांनी घटस्फोट घेतला. तेव्हा सैफने तिला पाच कोटी रुपये पोटगी दिली होती.

सनी देओल आणि अमृता सिंगचं अफेअर

सनी देओलने 1983 मध्ये 'बेताब' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये अमृता सिंह त्याच्यासोबत दिसली होती. यानंतर दोघांच्याही रिलेशनशिपच्या बातम्या आल्या. पण, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि सनी देओलने अवघ्या एका वर्षात लग्न केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Happy Birthday Rahul Roy : सलमान-शाहरुखपेक्षा भारी स्टारडम, 11 दिवसांत 47 चित्रपट साईन; 'या' चुकीमुळे करियर उद्ध्वस्त