मुंबई : मुकेश आणि नीता अंबानी यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. ग्रॅण्ड, भव्य..दिव्य हे शब्दही या लग्नासमोर अक्षरश: फिके पडले. उद्योग, राजकारण, बॉलिवूड जगतापासून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी या लग्नाला हजेरी लावली. परंतु या सोहळ्यातील आणखी एका दृश्याने सगळ्यांचं लक्ष वेधून गेलं.


लग्नात रात्री पाहुणे मंडळी जेवायला बसली तेव्हा त्यांना जेवण वाढायला दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क महानायक अमिताभ बच्चन होते. हे कमी की काय म्हणून मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानही वऱ्हाडी मंडळींना जेवण वाढताना दिसला. वाढप्याच्या भूमिकेत असलेल्या अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.


देशातले इतके मोठे कलाकार जर जेवण वाढत असतील तर पाहुण्यांना नक्कीच दोन घास जास्त गेले असतील. मुलीकडचे बनून अमिताभ आणि आमीर यांनी लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.