मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना काल (शुक्रवार) अचानक मानेचा आणि पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, रेग्युलर चेकअपनंतर अमिताभ यांना काल रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला.
गुरुवारी रात्री ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या सिनेमाचं शुटिंग गोरेगाव फिल्मसिटीत सुरु होतं. ते उशिरापर्यंत चालू असल्याने त्याचाच त्रास जाणवत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आवश्यक त्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
अमिताभ बच्चन यांना 2012 मध्येही शस्त्रक्रियेसाठी 12 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बच्चन यांना यकृतासंबंधीचा त्रास आहे. त्याचबरोबर 2005 मध्येही त्यांच्या पोटात प्रचंड दुखत असल्याने त्यांच्यावर आतड्यांसंबंधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाचं शुटिंग सध्या सुरु आहे. 7 नोव्हेंबर 2018 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
नियमित तपासणीनंतर अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Feb 2018 11:05 PM (IST)
महानायक अमिताभ बच्चन यांना काल (शुक्रवार) अचानक मानेचा आणि पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, रेग्युलर चेकअपनंतर अमिताभ यांना काल रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -