मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मागील महिन्यात त्यांच्या एका डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली होती. आपल्या दुसऱ्या डोळ्याची शस्त्रक्रिया देखील यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती त्यांनी ट्वविट करत आपल्या फॅन्सना दिली. खरेतर, अमिताभ कोणत्या प्रकारची सर्जरी करत आहेत अशी त्यांच्या फॅन्समध्ये खळबळ उडाली होती.
मी बरा होत आहे - अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चनने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शस्त्रक्रियेसंदर्भात माहिती देताना सांगितले की, " दुसऱ्या डोळ्यांची शस्त्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे आणि आता मी बरा होत आहे." ते पुढे म्हणाले की, "सगळं ठिक आहे". त्यांनी या प्रकाराला लाईफ चेंजिंग अनुभव असे म्हटले आहे.
<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">T 3842 - .. and the 2nd one has gone well .. recovering now ..<br>all good .. the marvels of modern medical technology and the dexterity of dr HM 's hands .. life changing experience .. <br>You see now what you were not seeing before .. surely a wonderful world !!</p>— Amitabh Bachchan (@SrBachchan) <a rel='nofollow'>March 14, 2021</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>
वेळेआधी करायला हवी शस्त्रक्रिया - अमिताभ बच्चन
अमिताभने याआधी त्यांच्या ब्लॉगमध्ये शस्त्रक्रियेबद्दल लिहिले होते. त्यांनी सांगितले होते की, 'शस्त्रक्रियेमुळे ते कसे नवीन सुंदर जग बघू शकत आहेत'. त्यांनी या प्रकाराला खूप खास अनुभव असे म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, 'शस्त्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा उशीर होता कामा नये. थोडासा उशीर देखील तुम्हाला अंधत्वाकडे घेऊन जाऊ शकतो'. तसेच ते म्हणाले की, "मी सल्ला देतो की, तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही वेळीच शस्त्रक्रिया करायला हवी".
अमिताभने त्यांच्या फॅन्सना धन्यवाद देत म्हणाले की, तुमच्या प्रेमासाठी आणि आपुलकीसाठी मी आभारी आहे. तुम्ही ज्याप्रकारे माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना करता ते पाहून मी खूप भाऊक होतो.