Bollywood News : आलिया भट्टच्या RRR या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात आलिया सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. आलियाचा जो फोटो समोर आला आहे, त्यानुसार तिची भूमिका दमदार असल्याचं दिसून येत आहे. RRR सिनेमातील आलियाच्या फर्स्ट लूकमुळे तिच्या चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे. 


आज आलिया भट्टच्या वाढदिवशी या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सीताचा लूक रिलीज करण्यात आला आहे. फोटोत आलिया भट्ट हिरव्या साडीत दिसत आहे. तर तिच्या पुढे पूजेचं ताट दिसत आहे. 






बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली RRR सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सीताच्या भूमिकेतील आलियाचा लूक साधा असला तरी चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे. याआधी एक फोटो शेअर करत फिल्ममेकर्सनी आलियाची एक झलक दाखवली होती. या फोटोमध्ये आलिया ब्लॅक शेडेड जागी बसल्याचं दिसत आहे. ती एखाद्या मंदिरात बसल्याचं दिसून येत आहे. तर समोर प्रभू रामाची मूर्तीही दिसत आहे. 


RRR सिनेमात आलियासोबत ज्युनियर एनटीआर, अजय देवगन आणि राम चरण देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा एक पिरियड ड्रामा सिनेमा आहे, ज्यात सर्व कलाकार एकाच वेळी स्क्रीनवर दिसतील. 






हा सिनेमा दोन महान भारतीय स्वातंत्र्य सेनानी अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. अल्लुरी सीताराम यांच्या भूमिकेत राम चरण तर कोमाराम यांच्या भूमिकेत ज्युनियर एनटीआर दिसणार आहेत. हा सिनेमा जवळपास 10 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. येत्या 13 ऑक्टोबर 2021 रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.