Amir Khan Girlfriend : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेला आमीर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण म्हणजे त्याची नवीन गर्लफ्रेन्ड. गौरी स्प्रॅट असं तिचं नाव असून ती आमीर खानच्या प्रोडक्शन कंपनीत काम करते. गेल्या 25 वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखत आहेत तर दीड वर्षांपासून ते एकमेकांसोबत राहत आहेत. आमीर खानने त्याच्या 60 व्या वाढदिवसाच्या वेळी गौरीची ओळख करुन दिली.
गौरी स्प्रॅट ही एक अँग्लो-इंडियन असून तिचे वडील तामिळ-ब्रिटिश तर आई पंजाबी-आयरिश वंशाची आहे. ती बंगळुरूमध्ये राहते आणि आमिर खानच्या प्रोडक्शन कंपनीत काम करते. गौरीला सहा वर्षांचा मुलगाही आहे. आमिरने गौरीची त्याच्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली आहे. त्यांना या दोघांचे रिलेशन मान्य आहे.
Gauri Spratt Education : गौरी स्प्रॅटचे शिक्षण किती?
गौरी स्प्रॅट ही उच्च शिक्षित असून माउंटन स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स लंडनमधून फॅशन, स्टाइलिंग आणि फोटोग्राफीमध्ये FDA ((Foundation Degree in Arts)) पदवी प्राप्त केली आहे.
आमिर खान आणि त्याची या आधीची पत्नी किरण राव यांनी 16 वर्षांच्या लग्नानंतर 2021 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. या निर्णयासाठी किरण राव यांनी आपल्या वैयक्तिक स्पेसला जबाबदार धरले होते. घटस्फोटानंतरही दोघांमध्ये घट्ट मैत्री आणि कौटुंबिक नाते कायम असून ते त्यांचा मुलगा आझादचे सहपालक आहेत.
घटस्फोट होऊनही आमिर आणि किरण यांनी त्यांच्या नात्यातील सकारात्मक पैलू जपले आहेत. किरणने सांगितले की आमीर हा तिचा मित्र आणि गुरु आहे आणि ते एकमेकांच्या कुटुंबाला आपले मानतात. आमीरच्या आईला किरण अजूनही तिची सासू मानते तर आमीरची मुले जुनैद आणि इरा हे तिचे मित्र आहेत.
आमिरच्या वैवाहिक आयुष्यातील प्रवास
आमिर खानने याआधी दोन वेळा विवाह केला आहे. 1986 मध्ये त्याने पहिल्या पत्नी रीना दत्त हिच्याशी लग्न केले होते. मात्र, 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2005 मध्ये त्याने किरण रावशी दुसरे लग्न केले, परंतु 2021 मध्ये त्यांचेही लग्न संपुष्टात आले. आता गौरीसोबतच्या नात्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
ही बातमी वाचा: