Housefull 5 Release: हाऊसफुल (Housefull) या विनोदी चित्रपटाचे चार भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. हाऊसफुल-1, हाऊसफुल-2, हाऊसफुल-3 आणि हाऊसफुल-4 या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता लवकरच हाऊसफुल-5 (Housefull-5) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतीच अभिनेता  अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रितेश देशमुख यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन हाऊसफुल-5  या चित्रपटाची घोषणा केली आहे. 


रितेश देशमुखची पोस्ट


रितेशनं हाऊसफुल-5 या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आम्ही परत आलो! आणि यावेळी तुमची दिवाळी नक्कीच उजळणार आहे!' अक्षयनं देखील सोशल मीडियावर हाऊसफुल-5 या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. 'Get ready for FIVE times the madness!' असं कॅप्शन अक्षयनं या पोस्टला दिलं आहे.






'हाऊसफुल' हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय, रितेश, लारा दत्ता, दीपिका पदुकोण, अर्जुन रामपाल आणि बोमन इराणी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट हिट घोषित करण्यात आला, त्यानंतर 2012 मध्ये रिलीज  'हाऊसफुल 2' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय, रितेश, जॉन अब्राहम, श्रेयस तळपदे, जॅकलीन फर्नांडिस, ऋषी कपूर, रणधीर कपूर, मिथुन चक्रवर्ती यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या दोन्ही भागांचे दिग्दर्शन साजिद खान यांनी केले होते. त्यानंतर हाऊसफुल-3 आणि हाऊसफुल-4 हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले. आता हाऊसफुल-5 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


तरुण मनसुखानी हे हाऊसफुल-5 या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन साजिद नाडियाडवाला करणार आहे. हाऊसफुल-5 हा चित्रपट 2024 मध्ये दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


अक्षयचे आगामी चित्रपट


'हाऊसफुल-5' या चित्रपटाबरोबरच अक्षयच्या आणखी काही आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  अक्षयचा 'हेरा फेरीः 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedant Marathe Veer Daudale Saat) या  चित्रपटाच्या माध्यमातून देखील अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  


संबंधित बातम्या


OMG 2 Release Date: 'ओएमजी 2' ची रिलीज डेट जाहीर; अक्षय कुमारनं शेअर केलं पोस्टर, लूकनं वेधलं लक्ष