Allu Arjun : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) त्याच्या ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: The Rise) या चित्रपटामधून विशेष लोकप्रियता मिळवली. पुष्पा द राइज हा चित्रपट 2021 मध्ये जगभरात रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पाः2 म्हणजेच पुष्पा द रुल (Pushpa: The Rule) या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पा चित्रपटाच्या या दुसऱ्या पार्टमध्ये पहिल्या पार्ट प्रमाणेच ड्रामा, अॅक्शन आणि थ्रिल बघायला मिळणार आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल....
10 भाषांमध्ये पुष्पा-2 होणार रिलीज
पुष्पा चित्रपटाला भारतातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली. पुष्पा चित्रपटातील डायलॉग्सला, चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागानं 300 कोटींपेक्षा कमाई केली. रिपोर्टनुसार, आता पुष्पा चित्रपटाचा दुसरा भाग दहा भाषांमध्ये रिलीज करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. चित्रपट निर्माते पुष्पा-2 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 50 कोटी खर्च करणार आहेत. चित्रपट निर्माते वाय. रवि शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 500 कोटींचे बजेट या चित्रपटाचे असणार आहे.
2023 मध्ये होणार रिलीज
वाय. रवि शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा-2 हा चित्रपट ऑगस्ट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, फहाद फाजिल आणि रश्मिका मंदाना हे पहिल्या पार्टचे कलाकार दिसतील. तसेच पुष्पा-2 मध्ये अभिनेता विजय सेतुपती देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. ‘पुष्पा: द रूल’ चित्रपटाचं शूटिंग डिसेंबर 2022 मध्ये सुरु होणार आहे.
हेही वाचा:
- Pushpa 2: पुष्पा-2 मध्ये करणार काम? मनोज वाजपेयी यांची भन्नाट प्रतिक्रिया
- Allu Arjun: हिंदी चित्रपटात काम करणार का? 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन म्हणतो, 'अवघड वाटतं...'