Allu Arjun Top 10 Movies : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) सध्या 'पुष्पा 2' या सिनेमामुळे चर्चेत आहे. अल्लूसाठी यंदाचा वाढदिवस खूपच खास असणार आहे. त्याचा 'पुष्पा : द रूल' (Pushpa The Rule) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. आज त्याच्या वाढदिवशी त्याच्या 'टॉप 10' (Top 10) सिनेमांबद्दल जाणून घ्या...


पुष्पा द राइज (Pushpa The Rise) : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राइज' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका  मंदान्नाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 


आला वैकुंठपुरमूलो (Ala Vaikunthapurramuloo) : 'आला वैकुंठपुरमूलो' हा सिनेमा 2020 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. या सिनेमात अल्लू अर्जुनने बंटूची भूमिका साकारली आहे. एसएस थमनने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 


रुद्रमादेवी (Rudramadevi) : अल्लू अर्जुनने 'रुद्रमादेवी' या सिनेमात गोना गन्ना रेड्डीची भूमिका साकारली होती. या सिनेमामुळे अल्लू अर्जुनला एक वेगळी ओळख मिळाली होती. अल्लू अर्जुनच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत या सिनेमाचादेखील समावेश आहे. 


सराइनोडू (Sarrainodu) : 'सराइनोडू' हा सिनेमा 2016 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बोयापती श्रीनूने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. 


रेस गुर्रम (Race Gurram) : 'रेस गुर्रम' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली होती. या सिनेमातील कलाकारांचा अभिनय, संगीत, अॅक्शन, दिग्दर्शन सर्वकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. या सिनेमासाठी अल्लू अर्जुनला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 


पुत्र सत्यमूर्ती (Putra Satyamurti) : 'पुत्र सत्यमूर्ती' हा सिनेमा खूपच भावनिक आहे. या सिनेमात अल्लू अर्जुनने पुत्र सत्यमूर्तीची भूमिका साकारली आहे. या सिनेमालादेखील बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यश आलं होतं.


जुलायी (Julayi) : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत 'जुलायी' या सिनेमाचा समावेश आहे. अल्लू अर्जुनच्या करिअरमध्ये 'जुलायी' या सिनेमाचा महत्त्वाचा वाटा आहे. हा सिनेमा प्रेक्षक युट्यूबवर पाहू शकतात.


वेदम (Vedam) : अल्लू अर्जुनच्या 'वेदम' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमात अल्लू अर्जुनने राजूची भूमिका साकारली होती. एका मध्यमवर्गीय राजूची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.


आर्य (Arya) : आर्य सुकुमार दिग्दर्शित 'आर्य' या सिनेमाची अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. हा रोमॅंटिक सिनेमा 2004 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


संबंधित बातम्या


Allu Arjun : 'पुष्पा' नाही तर अल्लू अर्जुनच्या 'या' सिनेमाने IMDB च्या शर्यतीत मारली बाजी; जाणून घ्या 'टॉप 10' सिनेमांची यादी...