Celina Jaitly On Fans Marriage Proposal: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सेलिना जेटलीनं (Celina Jaitly) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. जानशीन या चित्रपटामुळे सेलिनाला विशेष लोकप्रियता मिळाली. सेलिनानं पीटर हागसोबत लग्न केलं. पीटर आणि सेलिना यांना तीन मुलं आहेत. ट्विटरवर सेलिनाच्या चाहत्यानं तिला प्रपोज केलं. चाहत्याच्या ट्वीटला सेलिनानं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले.
चाहत्यानं केलं प्रपोज
ट्विटरवर ट्वीट शेअर करत एका चाहत्यानं सेलिनाला प्रपोज केलं. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'सेलिया जेटली, माझी तब्येत ठिक नाहीये. माझी काळजी घ्यायला कोणी नाही.माझी तब्येत आणखी बिघडण्याआधी माझ्याशी लग्न कर. मी घर जावई व्हायला तयार आहे.'
सेलिनाचा रिप्लाय
चाहत्याच्या ट्वीटला रिप्लाय देत सलिनानं लिहिलं, 'माझ्या तीन मुलांना आणि माझ्या पतीला विचारुन मी तुम्हाला सांगेल.' सेलिनानं दिलेल्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर सलिनाच्या या रिप्लायचं कौतुक केलं.
नेटकऱ्यांनी केलं कौतुक
सेलिना जेटलीनं तिच्या चाहत्याला दिलेल्या रिप्लायचं अनेकांनी कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं ट्विटवर लिहिलं, "प्राइसलेस रिस्पॉन्स." तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, मस्त रिप्लाय दिला.
सेलिना जेटलीनं ऑगस्ट 2011 मध्ये पीटर हागशी लग्न केले. या जोडप्याला दोन जुळी मुले आणि पाच वर्षांचा मुलगा आर्थर आहे. सेलिना जेटली आणि तिचे कुटुंब ऑस्ट्रेलियात राहते.सेलिना ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टावर ती स्वतःचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असते. सेलिना जेटलीला इन्स्टाग्रामवर 372K फॉलोवर्स आहेत. सेलिनाच्या सोशल मीडियावरील पोस्टवर नेटकरी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
सेलिनाने 'जनशीन', 'नो एंट्री', 'अपना सपना मनी मनी' आणि 'गोलमाल रिटर्न्स'या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण सध्या सेलिनानं चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: