मुंबई : अभिनेत्री आलिया भट आणि कतरिना कैफ यांच्या मैत्रीची बॉलिवूड आणि मीडियामध्ये फार चर्चा होती. पण आता त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आल्याचं कळलं. अभिनेता रणबीर कपूरमुळे आलिया आणि कतरिना यांच्या मैत्रीत कटुता आल्याचं म्हटलं जात आहे.

एका वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट सध्या अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात व्यस्त आहेत. बुल्गारियामध्ये शूटिंग करुन आलिया भारतात परतली. पण रणबीर सध्या लंडनमध्ये आहे. रणबीरसोबत वेगळ झाल्याचं दु:ख कतरिनाच्या मनात अजूनही कायम आहे. त्यात ‘ब्रह्मास्त्र’दरम्यान रणबीर आणि आलियाची जवळीक कतरिनाला छळत आहे.

‘ब्रह्मास्त्र’च्या चित्रीकरणादरम्यान कास्ट आणि क्रूशी संबंधित प्रत्येक व्यक्ती रणबीर आणि आलियाच्या अफेअरबाबत बोलत आहे, असं कतरिनाच्या एका मैत्रिणीने सांगितलं. तर एका कॉमन फ्रेण्डकडूनही कतरिनाला अफेअरबद्दल कळलं. यामुळे कतरिना नाराज आहे.