Alia Bhat : एकीकडे आलिया भटचा "राॅकी और रानी की प्रेमकहानी" ने बाँक्स आॅफिसवर चांगलीच कमाई केली आहे आणि आता आलिया तिच्या आगामी चित्रपट हार्ट आॅफ स्टोन चित्रपटाची वाट पाहत आहे. लवकरच आलिया भट्ट हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटसोबत 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटात दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया भट्ट गेल गडोतला तेलुगु शिकवताना दिसत आहे.


व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आलिया तेलगू भाषेत बोलताना दिसत आहे. ती नमस्कारला तेलगू भाषेत कसे बोलायचे ते सांगते. तिने सांगितल्यानंतर लगेच तिच्या पाठोपाठ गॅल गॅडोट देखील तेलगू भाषेत नमस्कार असे म्हणते. 
प्रेक्षकांनी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंत केले आहे. चाहत्यांन व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आलिया भट्टने तेलगू चित्रपट RRR मध्ये काम केले आहे. या चित्रपटात ती ज्युनियर एनटीआर आणि रामचरणसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.


'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमात आलिया भट्ट खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर गॅल गॅडोट आणि जेनी डॉर्नन हे हॉलिवूडचे लोकप्रिय कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात आलिया गॅल गॅडोटच्या 
गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. दिलेलं मिशन पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करताना आलिया दिसणार आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाची आलियाचे चाहते गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. प्रेग्नेंसी दरम्यान ही आलियाने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. आलियाचा हा पहिलाच हॉलिवूड (Alia Bhatt First Hollywood Movie) सिनेमा असल्याने तिच्यासाठी हा सिनेमा खूपच खास आहे.






'हार्ट ऑफ स्टोन' नेटफ्लिक्सवर होणार रिलीज! Heart Of Stone Release On Netflix)


आलिया भट्टचा आगामी 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  हा चित्रपट 11 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आलियाला अनेक गोष्टी शिकता आल्या आहेत, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती. 


या अभिनेत्रींनी हॉलिवूडसृष्टी गाजवली 


अभिनेत्री आलिया भट्टच्या आधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी हॉलिवूड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), तब्बू (Tabu) या अभिनेत्रींचा समावेश आहे. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Blackpink: ब्लॅकपिंक या के पॉप गर्ल ग्रुपनं इंडस्ट्रीमध्ये पूर्ण केली सात वर्ष; मेंबर्सनं शेअर केल्या खास पोस्ट