Blackpink: के पॉप गर्ल ग्रुप ब्लॅकपिंकने (BLACKPINK) इंडस्ट्रीमध्ये  7 वर्षे पूर्ण केली आहेत. ब्लॅकपिंक या बँडमध्ये जिसू, लिसा, रोज आणि जेनी हे चार सदस्य आहेत. गेल्या काही वर्षांत, ब्लॅकपिंक ग्रुपच्या म्युझिक व्हिडीओ आणि गाण्यांनी YouTube आणि इतर प्लॅटफॉर्मवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.  2016 मध्ये या ब्लॅकपिंक  (BLACKPINK) बँडची सुरुवात झाली. ब्लॅकपिंकने इंडस्ट्रीमध्ये 7 वर्षे पूर्ण केल्याबद्दल या ग्रुपमधील मेंबर्सनं खास पोस्ट शेअर केली आहे.


रोजची पोस्ट


ब्लॅकपिंक बँडची मेंबर रोजनं पोस्टमध्ये लिहिलं, "धन्यवाद, ब्लॅकपिंक माझ्या आयुष्यात  आल्याबद्दल. एक महत्त्वाकांक्षी कलाकार म्हणून मी मोठे होण्याचे जे स्वप्न पाहिले होते त्याहून अधिक  मी  ब्लॅकपिंकमुळे अनुभवू शकले आहे.  Blinks, Teddy, YG एंटरटेनमेंट आणि इतर प्रत्येकजण ज्यांनी गेली सात वर्षे Blackpink वर विश्वास ठेवला होता. आम्हा चौघांच्या सात वर्षांच्या प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येक गायकाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त  करते. ब्लॅकपिंकला आज अधिकृतपणे सात वर्षांचा आहे."






जिसूनं देखील सोशल मीडियावर खास फोटो शेअर केला आहे. तिनं या फोटोला, ब्लिंक ब्लॅकपिंक फॉरेवर असं कॅप्शन दिलं आहे.






लिसा आणि जेनी यांनी देखील ब्लॅकपिंकला सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.






ब्लॅकपिंकचे सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन ब्लॅकपिंक मेंबर्सला शुभेच्छा देत आहेत.जागतिक स्तरावर सर्वात लोकप्रिय के-पॉप गर्ल ग्रुप एक म्हणून ब्लॅकपिंकने आंतरराष्ट्रीय म्युझिक इंडस्ट्रीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.Ddu-Du Ddu-Du या त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


BTS 10th Anniversary : जगाला भुरळ पाडणारे BTS! भाषेच्या मर्यादा ओलांडणाऱ्या बॉय बँडला 10 वर्ष पूर्ण; जाणून घ्या त्यांचा आतापर्यंतचा प्रवास