Ali Baba Sheezan Khan Replacement : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येनंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' (Ali Baba Dastaan E Kabul) ही मालिका चर्चेत आली. आता या मालिकेसंदर्भात एक महत्तावाची अपडेट समोर आली आहे. या मालिकेत तुनिषा शर्मा आणि शिझान खान (Sheezan Khan) मुख्य भूमिकेत होते. पण आता तुनिषाच्या आत्महत्येमुळे शिझान खान सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तुनिषाच्या निधनानंतर या मालिकेचं शूटिंग बंद होतं. पण आता मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अभिनेता अभिषेक निगम (Abhishek Nigam) तुनिषाची जागा घेणार आहे. 


तुनिषाच्या आत्महत्येनंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली होती. पण निर्मात्यांनी मालिकेचा सेट दुसऱ्या जागी बदलला असून आता अभिनेता अभिषेत निगम आता या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 






मीडिया रिपोर्टनुसार, तुनिषाच्या आत्महत्येनंतर शिझान खानला मालिकेतून काढण्यात आले आहे. लवकरच अभिषेक शूटिंगला सुरुवात करणार आहे. अभिषेक 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. अद्याप तुनिषाची जागा कोण घेणार हे समोर आलेलं नाही. 


तुनिषाच्या शर्माच्या आत्महत्येने 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' या मालिकेसंबंधित सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. शूटिंग करताना प्रत्येकाला भीती वाटत आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर मालिकेचा सेट बदलण्यात आला आहे. त्यामुळे आता मालिका बंद होणार नसून मालिकेच्या कथानकात बदल होईल.


संबंधित बातम्या


Tunisha Sharma : शो मस्ट गो ऑन... तुनिषाच्या निधनानंतर 'अली बाबा : दास्तान - ए काबुल' मालिकेच्या शूटिंगला सुरुवात; जाणून घ्या सेटवरचं वातावरण कसं आहे?