'रुस्तम' 100 कोटी क्लबमध्ये, सिनेमातून 153 टक्के नफा
एबीपी माझा वेब टीम | 21 Aug 2016 08:36 AM (IST)
नवी दिल्लीः बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या रुस्तम सिनेमाने एका आठवड्यातच शंभर कोटी क्लबचा टप्पा गाठला आहे. यासोबतच या सिनेमाने 2016 वर्षातील व्यवसायाच्या दृष्टीने सर्वात फायदेशीर सिनेमा होण्याच्या दृष्टीनेही वाटचाल केली आहे. 'रुस्तम' सिनेमाचं एकूण बजेट 40 कोटी रुपये आहे. मात्र सिनेमाने आतापर्यंत 101 कोटींचा व्यवसाय केला आहे. यामध्ये सिनेमाला 61.30 कोटी म्हणजेच 153 टक्के निव्वळ नफा झाला आहे, असं वृत्त कोईमोई या वेबसाईटने दिलं आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/766946588719616000 'रुस्तम' 2016 मधील सर्वात जास्त कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे. सलमान खानचा 'सुलतान', अक्षय कुमारचाच 'एअरलिफ्ट' आणि 'हाऊसफुल 3' या सिनेमांनी आतापर्यंत चालू वर्षात शंभर कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.