Akshay Waghmare On Khurchi Marathi Movie : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (Arun Gawli) यांचा जावई अर्थात अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) सध्या त्याच्या आगामी 'खुर्ची' (Khurchi) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं असून या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


आता खुर्ची आपलीच : अक्षय वाघमारे
 
अभिनेता अक्षय वाघमारे 'खुर्ची' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमातील त्याच्या भूमिकेची झलक दाखवणारं पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेता अक्षय वाघमारेने या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"ही खुर्चीची लढाई आहे, इथं रक्त सांडल्याशिवाय तख्त मिळत नाही...आता खुर्ची आपलीच". 




'खुर्ची' या सिनेमाच्या नव्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षयने शेअर केलेल्या या पोस्टरवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकदम भारी, कडक भाऊ, कमाल पोस्टर, भारीच अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल होत आहे.


कलाकारांची फौज असलेला 'खुर्ची'


कुसुम हगवणे यांनी 'खुर्ची' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'खुर्ची' या सिनेमात या राकेश बापट, अक्षय वाघमारे,आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घग, अभिनेत्री , प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.  याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.


'खुर्ची' कधी होणार प्रदर्शित? (Khurchi Movie Release Date)


'खुर्ची' हा सिनेमा 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत.‘खुर्ची’चं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 'कोण आला रे कोण आला, खुर्चीसाठी लढणारा वाघ आला', ही खुर्चीची लढाई आहे, इथं रक्त सांडल्याशिवया तख्त मिळत नाही, असे या सिनेमातील डायलॉग आहेत. 'खुर्ची'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.


संबंधित बातम्या


Arun Gawali : माझं वय झालंय...तुरुंगातून सुटका करा; कुख्यात डॉन अरुण गवळीची कोर्टाकडे याचिका